Published On : Mon, Jul 16th, 2018

दुधाला योग्य दर देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे

पुणे : दुधाला ५ रूपये दरवाढ देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुणे येथे सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाला सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला आहे.

शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधाच्या दराकडे विद्यमान सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यासाठी पुण्यात आंदोलन करत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शेतकरी शांतपणे आपल्या मागण्या सरकारच्या पुढे मांडत होते, मात्र, त्यावेळी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे आता आंदोलन करत शेतकरी आपला हक्क मागत आहे. आता सरकारने जागे व्हायलाच हवे, असे त्यांनी नमूद केले आहे.