Published On : Wed, Jul 8th, 2020

मोबाईल खेळु न दिल्याने तेरा वर्षाच्या मुलाने केली अात्महत्या

रामटेक: रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील नगरधन येथिल तेरा वर्षाच्या मुलाने घरी गळफास लावुन अात्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात अाहे.

सविस्तर माहीती अशी की प्रिन्स रविंन्द्र खानकुळे वय १३ वर्ष हा वर्ग अाठवी इंदिरा गांधी विद्यालय, नगरधन येथे शिकत होता. प्रिन्स ला मोबाईल गेम खेळायचा छंद होता. तो रोज मोबाईल गेम खेळायचा पण त्याला वडील मोबाईल गेम खेळण्यावरुन रागवत होते.पण प्रिन्स हा जिद्दी स्वभावाचा असल्यामुळे वडीलांनी मोबाईल खेळु देत नसल्यामुळे अाज ८ जुलैला सकाळी ९ वाजताच्या सुमारास अाई वडील शेतात शेतकाम करायला गेले असताना प्रिन्सने घराच्या छताला गळफास लावुन अात्महत्या केली.याबाबत

पोलीस स्टेशनला माहीती मीळताच रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात अाले. सदर गुन्हाच्या माहीतीवरुन अाकस्मिक मृत्युची नोंद सीआरपीसीचे कलम 174 अन्वये करण्यात अाली असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत अाहेत.