Published On : Sat, Nov 16th, 2019

कन्हान व परिसरात चोरांचा धुमाकुळ .

Advertisement

कन्हान : – शहर व परिसरातील गावा मध्ये होणा-या चो-या घरफोडीचे चोर पकडण्यात कन्हान पोलीस अपयशी ठरत असल्याने चोराची हिम्मत वाढुन दिवसें दिवस चो-याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

गुरुवार (दि.१४) च्या मध्यरात्री अञात चोरांनी केरडी येथील पिंटु मनोहर खंडाळ यांच्या घराची मागील कपाऊंड भित कुदुन मागचे दार तोडुन घराच्या आत प्रवेश करीत एका खोली तील दोन कपाट व दुस-या एका खोली तील एक कपाटातील एका महिन्या पहिले लहान भावाच्या नामकरणात आलेले सोने, चांदीचे दागिने व बचत गाडग्या मधिल आणि सार्वजनिक गाव भाडयाचे नगदी जमा ठेवलेले रूपये असे एकुण दिड लाखाची चोरी करून अञात चोरांनी घरा मागील अशोक ठाकरे याच्या कपाशीच्या शेतात दागिने काढुन खाली डब्या, दागिन्याचे बिल बेकामी सामान फेकुन सोने, चांदीचे दागिने व नगदी रूपये घेऊन पसार झाले. फिर्यादी पिंटु मनोहर खंडाळ वय ३२ वर्ष मु केरडी यांनी तक्रार दाखल करताना पोलीसांनी ज्या दागिन्याचे बिल आहे त्याची तक्रार दाखल करा म्हटल्या नुसार लहान मुलाचे चांदीचे कडे व पैजन २१५ ग्रम किमत ७८०० रू, सोन्याच्या ४ अंगठी २ ग्रम ७००० रू, १ ग्रम चे ७ सोन्याचे लॉकेट किमत २४००० रू हाताचा कडा अर्धा ग्रम १००० रू व नगदी २० हजार रूपये असा एकुण ५९८०० रूपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परंतु फिर्यादी च्या घरातुन चोरांनी सोने, चांदीचे दागिने व नगदी अशी एकुण अदाजे दिड लाख रूपयांची चोरी करून पसार झाले आहे.

कन्हान शहरात घरातील सोन्या, चांदीचे दागिने, नगदी रूपये, सामान, बँटरी, बोर मधिल पंप, छोटय़ा मोठय़ा मशीन व इतर सामानाची चोरी होत असुन पिपरी, टेकाडी, गहुहिवरा, कांद्री, खंडाळा, कोळशा खदान परिसरात घरफोडी, विधृत तार, तांबे, लोंखडी खांब, डिझेल, ऑईल, रेती, कोळशा, गाय, बैल जनावरांची चोरी होत असुन चोर पकडण्यात कन्हान पोलीसांना अपयश येत असल्याने चोरांचे मनोबल वाढुन घरफोडय़ा व चो-याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होत असल्या ने कन्हान पोलीसांनी कसोसीने पर्यंत चालवुन चोरांना पकडुन होणा-या घरफोडी व चो-यावर अकुंश लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement
Advertisement