Published On : Sun, Jul 26th, 2020

सिंधूरागिरी नागरी सहकारी पत संस्था येथे चोरांनी मारला डल्ला

नागरिकांच्या जमा असलेल्या सव्वा लाख रुपयाचा मुद्देमाल लांबविल्याची घटना नागपंचमी च्या दिवशी उघडकीस


.
रामटेक: एकीकडे कोरोन्ना महामारी चे सावट आहे. आणि दुसरीकडे दिवस्नदिवस चोर चोरी चे ठिकाण शोधत आहे. पोलीस दिवस रात्र आपल्या कुटुंबा पासून दूर राहून कोरोणा योद्धा चे काम करत आहे.अज्ञात चोरांनी रात्री कोणीही नसल्याची संधी साधून सिंदुरागिरी नागरी सहकारी पत संस्था येथे डाका मारला. जवळपास सव्वा लाख रूपये मुद्देमाल लांबविल्याची घटना नागपंचमी च्या दिवशी उघडकीस आली.

सिंधूरागिरी नागरी सहकारी पत संस्था चे संचालक वांडरे पूजा करायला गेले असता चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी फिर्यादीच्या रिपोर्ट वरून गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी दिली. प्राप्त माहिती नुसार नागपंचमी असल्यामुळे पूजा करायला गेले असता चोरी झाल्याचे लक्षात आले . कर्ज हवे किवा पैसे भरायला काढायला पुष्कळ जन येत असतात कोणी हे काम केले हे पोलिस तपासात निष्पन्न होईलच असे सिंधूरागिरी नागरी सहकारी पत संस्था चे संचालक मनोहर वांडरे यांनी सांगितले.

चोरांनी मेन शटर न तोडता दुसऱ्या इमारतीवरून ढोले सर यांच्या घरावरून मोठी शीली तयार करून भिंतीला लाऊन दोन दरवाजे चे कुलूप तोडून दुसऱ्या मजल्या वरून आत प्रवेश केला व चोरी केली असल्याचे निष्पन्न झालं . चोर चोरी करून दोराच्या साहाय्याने खाली उतरले असल्याचे मनेजर विशाल कावळे यांनी सांगितले. कुणी तरी पाहणीत लाच असावा अशी देखील चर्चा सुरू आहे.श्वान पथक बोलविले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर करीत आहे..