Published On : Sun, Jul 26th, 2020

सर्प व निसर्गाचा अनमोल ठेवा – सर्प मित्र.

नागपंचमी च्या पूर्वसंध्येला दिले 7 फुट लांब अजगराला जिवनदान –

रामटेक – पर्यावरणात सरपाची महत्त्वाची भूमिका आहे. परंतु आज पृथ्वीवरून प्रश्न सर्प नष्ट होत असल्याने मोठे नुकसान होत आहे सर्व हे निसर्गाचा अनमोल ठेवा असून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे हळूहळू लुप्त होणाऱ्या प्रजाती ला वाचविण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

रामटेक पोलीस स्टेशन येथील पोलीस शिपाई रोशन पाटील, व योगेश भुरे रात्री गस्त करीत असता शितला माता मंदीर येथे ७ फुट लांब साप किराना दुकानाच्या शेटरमधुन आत शीरत असताना दिसला .


योगेश भुरे यानी सर्पमित्र अक्षय घोडाकाडे याना फोन करुन सुचना दिली यावरुन सर्प मित्र अक्षय घोडाकाडे व सर्पमित्र राम राऊत लगेच घटना ठिकाणी धाव घेवुन अजगराला जिवनदान देवुन पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केले.सर्पमित्राचे पोलीस प्रशासनाने खुप खुप आभार मानले.