Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jun 2nd, 2020

  मनपा मुख्यालयात थर्मल स्कॅनिंग सुरु

  नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे सिव्हील लाईन्स मुख्यालयात येणारे नागरिकांची थर्मल स्कॅनिंग सोमवारी (1 जून) ला प्रारंभ करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर थर्मल स्कॅनिंग करुन कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेश व्दारावरच सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची शरीराचे तापमानाची चाचणी करुन नोंद घेण्यात आली.

  महापौर श्री. संदीप जोशी, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे,‍ वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती अध्यक्ष श्री. पिंटू झलके, स्वास्थ समिती सभापती श्री. विरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक श्री. दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेता श्री. तानाजी वनवे यांनी सुध्दा स्वत:ची चाचणी करुन घेतली.

  तसेच मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे यांच्यासह मनपाचे अन्य अधिकारी व कर्मचारी आणि बाहेरुन येणारे नागरिकांनी पण स्वत:ची तपासणी करुन घेतली. दररोज 1000 ते 1500 लोकांची तपासणी केली जात आहे.

  Stay Updated : Download Our App

  Mo. 8407908145
  0Shares
  0