Published On : Sat, Dec 22nd, 2018

झाडांवरील फलक काढण्याचा धडाका सुरूच

धरमपेठ झोनअंतर्गत झाडांवरील २० जाहिरातदारांची अनेक फलके काढली

नागपूर : शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात मनपा उद्यान विभागाच्या नेतृत्वात ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने उघडण्यात आलेली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. झाडांना जाहिरात फलकांपासून मुक्त करण्याचा धडाका पथकाने आजही सुरूच ठेवला. २० जाहिरातदारांचे अनेक फलके काढून झाडांना फलकमुक्त करण्यात आले.

Advertisement

ही अभिनव मोहीम शनिवारी (ता. २२) धरमपेठ झोनमध्ये राबविण्यात आली. उद्यान विभागातील मार्गदर्शक सुधीर माटे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मनपा कर्मचाऱ्यांसोबत ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी हिरहिरीने भाग घेतला. धरमपेठ झोनअंतर्गत असलेल्या अनेक झाडांवरील जाहिरात फलके काढण्यात आली. ही फलके एकूण २० जाहिरातदारांची होती. व्यावसायिकांनी आपल्या जाहिराती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी झाडांचा बळी घेऊ नये, असे आवाहन ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी केले.

झाडांना इजा पोहचवून आपला व्यावसायिक दृष्टीकोन साधणाऱ्या आणि शहर विद्रूप करणाऱ्यांविरुद्ध यापुढे कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उद्यान विभागाचे सल्लागार सुधीर माटे यांनी दिला.

सदर मोहिमेत सुधीर माटे यांच्या नेतृत्त्वात मनपा उद्यान विभागाचे प्रेमचंद तिमाने, देविदास भिवगडे, धरमपेठ झोनचे दीनदयाल टेंभेकर, आनंद खोडसार, राजेंद्र शेट्टी, रिषी पंडित, संजीत खोब्रागडे, साजन दुगोर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, राजश्री गुप्ता सहभागी झाले होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement