Published On : Tue, Sep 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दुकान फोडून १.७० लाखांची रोकड लंपास; पाच आरोपींना अटक

दोन अल्पवयीन साथीदारांसह चोरीचा कट; ७० हजारांची रोकड जप्त
Advertisement

नागपुरात दुकान फोडून १.७० लाखांची रोकड लंपास; पाच आरोपींना अटक

नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकान फोडून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींकडून चोरीच्या रकमेपैकी ७० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

गोळीबार चौक, टिमकी तीनखंबा आणि खापरे मोहल्ला परिसरात मोहम्मद शहबान अन्सारी यांचे ‘रोमन ट्रेडर्स’ नावाचे दुकान आहे. ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ७ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Gold Rate
Sept 08,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,37,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून रोख रकमेच्या काउंटरमधून सुमारे १ लाख ७० हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी तक्रार मिळताच तहसील पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार वेदांत ऊर्फ छोटा कालू विकास चाटे, हिमांशू विकास चाटे आणि विनीत ऊर्फ काल्या कुन्हाडकर यांना ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

चौकशीत त्यांनी दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वेदांत चाटे आणि विनीत कुन्हाडकर यांच्याकडून ७० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

या टोळीने शहरातील आणखी काही चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा तपास तहसील पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.