Published On : Mon, Jun 21st, 2021

इतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी

Advertisement

-लोहमार्ग पोलिसांनी लावला १२ तासात चोरीचा छडा

नागपूर: नोकरावर विश्वास ठेवून त्याच्या भरोश्यावर कॅन्टिन सोडली. तोच कॅन्टिनचा कारभार पहायचा. अचानक त्याची नियत फिरली अन् त्याने दगा दिला. कामाच्या ठिकाणीच त्याने चोरी केली. मात्र, लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या १२ तासात या चोरीचा छडा लावला. शिवनारायण चतुर्वेदी (३१) रा. इतवारी रेल्वे क्वॉर्टर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

Gold Rate
25 April 2025
Gold 24 KT 96,300 /-
Gold 22 KT 89,600 /-
Silver / Kg 97,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विजय मिश्रा (४०) यांची इतवारी रेल्वे स्थानकावर कॅन्टिन आहे. या ठिकाणी शिवनारायण कामाला होता. बèयाच वर्षांपासून काम करीत असल्याने त्याच्यावर मिश्रा यांचा विश्वास होता. त्याच्या भरोश्यावर कॅन्टिन असायची. अलिकडे म्हणजे आठवड्याभरापूर्वी कॅन्टिनचे मालक विजय मिश्रा हे आपल्या मुळ गावी गेले. ही संधी साधून शिवनाराणनने कॅन्टिनमधून ५ हजार रुपये रोख, डीव्हीडी आणि एलसीडीची चोरी करून निघून गेला. त्याच दिवशी चोरीची तक्रार इतवारी लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिली. विशेष म्हणजे ही कॅन्टिन इतरवारी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशदारा जवळ आहे.

कॅन्टिनसमोर आरपीएफ आणि जीआरपी असे दोन पोलिस ठाणे आहेत. चोरीची माहिती विजय मिश्रा यांना देण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. सुरूवातीला पोलिसांनी एक दोन लोकांना ताब्यात घेवून चौकशी केली. त्यामुळे मुळ चोर असलेला शिवनारायणची बिधास्त झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली. सुरूवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांना चुकीचा पत्ता सांगितला. पोलिसांनी त्याच दिवशी रात्री त्याचा खरा पत्ता शोधून घरूनच अटक केली. त्याने चोरीची कबुली पोलिसांना दिली.

पाच हजार रुपये गावाला पत्नीकडे पाठविले असून एलसीडी आणि डीव्हीआर झाडाझूडपीत ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी शोध घेतला असता ते मिळून आले नाही. त्याने विक्री केली असावी असा अंदाज पोलिसांना आहे. लोहमार्ग पोलिसांनी शिवनारायणला अटक करून गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख यांच्या नेतृत्वात पीएसआय राजेश वरठे, धम्मदीप गवई, सतीश बुरडे आणि अमित अवतारे यांनी केली.

Advertisement
Advertisement