नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. ग्राहकाच्या वेशात दुकानात येऊन संधी साधत ती चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिमूर्ती नगर येथील राहुल रवींद्र मस्के यांचे हिवरीनगरमधील भीम चौकात ‘दीक्षा ज्वेलर्स अँड इमिटेशन’ नावाचे दुकान आहे. दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा साठा कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १ जून ते ११ जून या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
फुटेजमध्ये एक महिला वारंवार दुकानात येत असल्याचे दिसून आले. तपासादरम्यान संबंधित महिलेने दुकानदार आणि त्यांच्या वडिलांची नजर चुकवत वेगवेगळ्या वेळी सोन्याचे दागिने चोरल्याचे समोर आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांचे वजन सुमारे २५ ग्रॅम असून त्यांची किंमत जवळपास २ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
याप्रकरणी दुकानदाराच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी दिघोरी परिसरातील ३७ वर्षीय मोनाली प्रमोद कावडकर हिला अटक केली.
सध्या आरोपी महिलेकडे चौकशी सुरू असून तिने इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडवल्या आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. नंदनवन पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पिता से विवाद, बेटे ने पत्थर से फोड़ा सिर! #NagpurNews #Crime #FamilyDispute...
Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से...
16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का...
Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews
Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप...
एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप





