Published On : Sat, Jun 29th, 2019

क्षुल्लक वादातून तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला

कामठी :-कामठी तालुक्यांर्गत येणाऱ्या आडका शिवारात शेताजवळ असलेल्या विद्दूत खांबावरून लाईन का टाकली या विचारपूस दरम्यान झालेल्या क्षुल्लक वादातून दुसऱ्या गटातील इसमानि संगनमताने तरुणाच्या पाठीवर कुऱ्हाड व पायावर लोखंडी रॉड ने मारून जख्मि केल्याची घटना नुकतेच दुपारी 4 दरम्यान घडली असून जख्मि तरुणाचे नाव स्वप्नील भाऊराव अतकरे वय 28 वर्षे रा रा आडका तर आरोपीचे नाव प्रेम चंद्रभान चांभारे , आकाश दिलीप चांभारे व एक अनोळखी इसम सर्व राहणार आडका तालुका कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जख्मि फिर्यादी स्वप्नील अतकरे ची चार एकर शेती आडका शिवारात असून शेतीला लागूनच आरोपी प्रेम चांभारे चे वडील चंद्रभान चांभारे यांची शेती असून यांचा शेतीच्या धुऱ्याचा व रस्त्याच्या कारणावरून जुना वाद सुरू आहे.चंद्रभान चांभारे यांनी शेताच्या बाजूला असलेल्या विद्दूत खांबावरून इलेक्ट्रिक वायर घातले व शेताजवळील असलेल्या पेटीतील मोटारीचे स्टार्टर काढुन स्टार्टर दुरुस्ती करोत असता फिर्यादी ने चंद्रभान चांभारे यांना माझ्या शेताजवळ असलेल्या विद्दूत खांबावरून लाईन का टाकली असे विचारल्यावरून झालेल्या वादातून प्रेम चंद्रभान चांभारे यांनी आपल्या हातातील कुऱ्हाड पाठीवर मारून रक्तबंबाळ केले तर आकाश दिलीप चांभारे याने आपल्या हातातील लोखंडी रॉड पायावर मारून जख्मि केले तसेच प्रेम चांभारे याच्या भाच्याने अश्लील शिवीगाळ केल्याने स्थानिक मौदा पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रेम चांभारे, आकाश चांभारे व अनोळखी एका इसमाविरुद्ध भादवी कलम 324, 504, 506, 34 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी