Published On : Sat, Jun 29th, 2019

कामठी तालुक्यात पावसाने लावली हजेरी

कामठी :-कामठी तालुक्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली ज्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.जवळपास दुपारी 2 च्या नंतर पावसाने चांगलीच हजेरी लावली.आजच्या दमदार पावसाने वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

शेतकऱ्यांसह आजच्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.विशेषता शेतकऱ्यांच्या मशागतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या होत्या.रोहिणी नक्षत्र कोरडा गेला,मृग नक्षत्र ही कोरडा गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता .शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबलेल्या होत्या तर दुसरीकडे मागील दोन महिन्यांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते .

आजच्या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.तर बराच वेळ विद्दूत पुरवठा खंडित करण्यात आला होता.तालुक्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याची माहिती आहे एकंदरीत आजच्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागल्याचे दिसून आले.

संदीप कांबळे कामठी