Published On : Sat, Jun 29th, 2019

गाडेघाट येथे मरियम अम्मा दर्गा १०२ वा वार्षिक उर्स

कन्हान : – मरियम अम्मा दर्गा गाडेघाट येथे १०२ वा वार्षिक उर्स रविवार (दि.३०) ते दि.२ जुलै पर्यंत आयोजन करून तीन दिवसीय उर्स साजरा करण्यात येणार आहे .

कन्हान पासुन पश्चिमेला ३ कि मी लांब गाडेघाट येथील मरियम अम्मा दर्गा येथे आज रविवार दि. ३० जुन ला बाद नमाजे ईशा मिलाद व बाद मजारे पाक गुसल शरीफ सुबह नमाजे फजर सलाम करण्यात येईल. सोमवार दि.१ जुलै ला दुपारी १२ वाजता अम्मा दर्गा पासून शाही संदल काढुन पिपरी मार्गे कन्हान येथील आम्बेडकर चौक, रेल्वे स्टेशनला पोहचेल याच ठिकाणी संत बाबा ताजुद्दीन दर्गा ताजबाग नागपुरचा शाही संदल कामठी येथील बाबा अब्दुल्लाह शाह दर्गा येथे चादर चढवुन कन्हान च्या संदल मध्ये सहभागी होणार आहे.

दोन्ही संदल रेल्वे स्टेशन ते गहुहिवरा रोड गोवारी शहीद चौक, तारसा रोड चौक, आम्बेडकर चौक होत समापन अम्मा दर्गा गाड़ेघाट येथे करण्यात येईल. तेथे चादर चढवुन महाप्रसाद वितरण करण्यात येईल आणि कव्वालीचा कार्यक्रम सादर करण्यात येईल.

मंगळवार दि.२ जुलै ला सकाळी कुरान खानी, कुल शरीफ फातेहा करून उर्स चे समापन करण्यात येणार आहे. या उर्स मध्ये मोठ्या संख्येने परिसरातील भाविकांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन सज्जादानशीन ताजी तब्रेजुद्दीन, ताजी तन्विरुद्दीन, ताजी मुस्तफिजुद्दीन हयांनी केले आहे.