Published On : Sat, Aug 31st, 2019

राष्ट्रीय पेयजल योजनेची विहीर पाच महिन्या चार जागुन खचुन क्रक

Advertisement

कन्हान : – वराडा येथील पिण्याची पाणी समस्या सोडविण्या करिता राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत विहारीचे बांधकाम एप्रिल महिन्यात काम सुरू करण्यात आले असुन अवघ्या चार महिन्यात काल झालेल्या पावसाने चार जागुन क्रक होऊन विहार निकामी (कोल्यापस) झाल्याने बांधकाम करणारे कंत्राटदार दाबके व उप अंभियंता झोडापे यांच्यावर कठोर कार्यावाही करून नव्याने विहीर बांधकाम करण्या ची मागणी ग्रामस्थानी केली आहे.

ग्राम पंचायत वराडा येथील पिण्याची पाणी समस्या सोडविण्या करिता राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत वराडा गावा करिता ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उप अंभियता झोडापे यांच्या देखरेखीत २८ लाख १२ हजार रूपयांच्या निधी चे बांधकाम कंत्राटदार दाबके हयानी एप्रिल महिन्यात सुरू केले असून आतापर्यंत २२ रिंगाचे काम पूर्ण झाले असून आणखी तीन रिंगाचे बांधकाम बाकी असताना कालच्या पावसाने शुक्रवार ला विहार चार जागुन क्रक होऊन बाजुची माती आत जावुन विहीर निकामी (कोल्यापस ) होण्याच्या मार्गावर आहे.

कंत्राटदाराने जे सी बी च्या सहाय्याने माती खोदकाम करून खालुन विहीरी च्या रिंगाचे (पायल्याचे) बांधकाम केले. रिंगाच्या सभोवती भरणा व माती धुमस करून न भरण्यात आल्याने व व्यवस्थित बांधकाम न झाल्याने अवघ्या पाच महिन्यात विहार चार जागुन क्रक होऊन निकामी झाल्याने संबंधित बांधकाम करणारे कंत्राटदार दाबके व उप अभिंयता झोडापे यांच्यावर कठोर कार्यावाही करून नव्याने विहीर बांधकाम करण्याची मागणी ग्राम पंचायत वराडा सदस्य राकेश काकडे , दिनेश चिंचुलकर, अमोल देऊळकर, किशोर यादव, अशोक नागपुरे, प्रेमेश्वर खंडार सह ग्रामस्थानी केली आहे.