Published On : Sat, Aug 31st, 2019

रामटेक नगरीत भक्तिमय वातावरनात श्रावण मास सम्पन्न

रामटेक: धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाने सम्पन्न रामटेक नगरीत भक्तिमय वातावरणात श्रावण मास सम्पन्न झाला. रामटेक ,गडमंदिर ,अंबाला येथील मंदिर,शिवमंदिर व हनुमान मंदिरात पहिल्या श्रावण सोमवार पासून तर समाप्तीच्या दिवसापर्यंत विविध मंदिरात भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक व बेलपत्र चढवून तसेच फुलांची आरास करून भक्तिभावाने पूजा-अर्चना करण्यात आली. याप्रसंगी भजने,अखंड रामायण पाठ ,सुंदरकांड पाठ करण्यात आले.

महिलांच्या भाजनाने रामटेकमधील मंदिरात उल्हासित वातावरण निर्माण झाले.आशाबाई रोकडे, कल्पना हटवार,लता उईके,कविता कारामोरे,शशी महाजन,भोंडकर, लक्ष्मी भोयर ,रहांगडाले, बुरडकर,माधुरी महाजन, मांजाबाई कोसे ,शालिनी उईके ,वत्सला पाठक व महिला मंडळींनी श्री लंबे हनुमान मंदिरात अखंड रामायण पाठ,सुंदरकांड , भजने श्रावण महिन्यात केली. महिलांच्या वतीने दहिलाही व महाप्रसाद वितरण करण्यात आले.यावेळी मंदिर परिसर भक्तीने गजबजून गेला होता.
Attachments area