Published On : Sat, Aug 17th, 2019

फेटरी ग्राम आदर्श कृषी पर्यटन केंद्र व्हावे- अमृता फडणवीस

शेतकऱ्यांना विविध प्रजातीच्या वृक्षाचे वाटप

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श दत्तक ग्राम म्हणून फेटरीचा नावलौकीक देशभरात होत आहे. येत्या काळात फेटरी ग्राम आदर्श कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे व येथील लोकांना त्याद्वारे रोजगार प्राप्त व्हावा,

Advertisement

शेतकऱ्यांना संत्रा, लिंबू, सिताफळ, जांभूळ आदी स्वदेशी प्रजातीच्या 5 हजार 167 फळरोपांचे वितरण तसेच उज्ज्वल गॅस अंतर्गत महिलांना नवीन गॅस जोडणीचे श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

Advertisement

फेटरी येथील नवीन ग्रामपंचायत भवन परिसरात महाराष्ट्र शासन व नारडेको (नॅशनल रीअल इस्टेट डेव्हलपमेंट कौंसिल) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी तसेच वनविभागाला फळझाडे व उज्ज्वला गॅस अंतर्गत महिलांना नवीन गॅस जोडणीचे वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्रीमती अमृता फडणवीस बोलत होत्या.

खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार समीर मेघे, फेटरीच्या सरपंच श्रीमती धनश्री ढोमणे, नारडेकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, राजन बंडेलकर, एस. एस. हुसैन, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त डॉ. संदीप राठोड, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण, गटविकास अधिकारी किरण कोवे आदी उपस्थित होते.

फेटरीच्या ग्रामविकासाबद्दल समाधान व्यक्त करताना श्रीमती अमृता फडणवीस म्हणाल्या, फेटरीचा विकास पाहण्यासाठी देशभरातील नागरिकांनी यावे, आणि फेटरी हे कृषी पर्यटन विकसित होण्यासाठी फेटरीवासीयांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. फेटरीच्याच धर्तीवर कवडस आणि केळझर येथील विकासकामेदेखील नागरिकांच्या सहभागाने पूर्ण होत आहेत. विकास हा केवळ एका गावाचा न होता, प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होऊन तेथील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वानी प्रयत्न करुयात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

निसर्गाच्या प्रकोपाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, यासाठी शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार, ठिबक सिंचन पाण्याचे व्यवस्थापन आणि जलसंवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. इस्त्रायल, कॅलिफोर्निया येथील यशस्वी विविध प्रयोग राबववित आधुनिक शेती करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना मदत करत आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकरी बांधवांना फळझाडे पुरवून त्यांना त्याद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हायला‍ निश्चितच मदत होईल, असा विश्वास श्रीमती फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी वनविभाग तसेच शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात फळझाडे वितरीत करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने संत्रा, लिंबू, सिताफळ, जांभूळ आदी स्वदेशी प्रजातीच्या 5हजार 167 फळरोपांचे वितरण करण्यात आले. तसेच उज्ज्वला गॅस अंतर्गत महिलांना नवीन गॅस जोडणीचे प्रातिनिधीक स्वरुपात नारडेकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी फेटरीच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, फेटरी ग्राम हे देशामध्ये आदर्श ग्राम म्हणून विकसीत होत आहे, आज मुंबईतील आधुनिक परिवर्तनापेक्षाही नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावाचा विकास वेगाने होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच श्रीमती अमृता फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नामुळे आज या गावामध्ये शहराच्या तोडीच्या सर्व सोयीसुविधा गावातच उपलब्ध होत आहेत. नारडेकोच्या माध्यमातून फेटरी गावाला हरित ग्राम बनविण्यासाठी कमीत कमी जागा आणि पाणी वापरुन अधिक उत्पादन देणाऱ्या फळझाडांचे वाटप करताना मनस्वी आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार समीर मेघे, सरपंच धनश्री ढोमणे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, एस. एस. हुसैन आदिंची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मासोदकर यांनी तर आभार राजन बंडेलकर यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement