Published On : Sat, Aug 17th, 2019

शेतकऱ्यांनी कर्जमाफी तक्रार निवारण समितीचा लाभ घ्यावा:-पंकज वानखेडे

Advertisement

कामठी:-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजने अंतर्गत काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे व सहकार विभागाच्या विविध कार्यालयाकडे प्राप्त होत्या.या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्जपुरवठा केला जात नाही

त्यामुळेच शासनाच्या वतीने 12 जुलै 2019 च्या शासन निर्णया नुसार तालुकास्तरावर तालुका तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली असून शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात आवश्यक त्या कागदपत्रासह लेखी स्वरूपात कामठी तहसील कार्यालयातील तालुका सहाययक निबंधक सहकारी संस्था कामठी या कार्यालयात दर गुरुवारी सकाळी 10 ते 4 या वेळेदरम्यान तक्रार दाखल करून समाधान करून घ्यावे असे आव्हान सहाययक निबंधक अधिकारी पंकज वानखेडे यानो केले आहे.

संदीप कांबळे कामठी