Published On : Sat, Aug 17th, 2019

अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाचे श्रवण केल्याने मनुष्याला यशाचा मार्ग प्राप्त होतो- ह .भ. प. पांडुरंग कुरूमकर महाराज

Advertisement

कामठी : -श्रावण मासात अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाचे श्रवण केल्याने मनुष्याला यशाचा मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीन कल्याण होत असल्याचे मत पांढुरना मध्य प्रदेश येथील ह भ प पांडुरंग मुरूमकर महाराज यांनी तालुक्यातील येरखेडा येथील शिव पंचायत मंदिरात आयोजित श्रावण मास कीर्तन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन ‘क’ श्रेणी तीर्थक्षेत्र शिव पंचायत मंदिर, येरखेडा येथे संपूर्ण श्रावण मासात भजन-कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आज ह भ प पांडुरंग मुरूमकर महाराज यांचे अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पांडुरंग मुरुमकर महाराज म्हणाले, श्रावण मासात प्रत्येक मनुष्याने प्रतिदिन भगवंताचे नामस्मरण करून अखंड हरिनाम कीर्तनाचे श्रवण केल्याने मनुष्याला सकारात्मक दृष्टिकोण प्राप्त होऊन सर्वांगिन कल्याण होत असल्याचे मत व्यक्त केले व प्रत्येक मनुष्याने प्रतिदिन भगवंताचे नामस्मरण करण्याचे आव्हान केले किर्तन कार्यक्रमात ह-भ-प बबलू उपासे महाराज पांडुरना यांनी भजन सादर करूं प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष व नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले संचालन सचिव पंढरी अबाडकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा सुदाम राकडे यांनी मानले कार्यक्रमाला मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष किशोरीताई भोयर ,अनुराधा भोयर ,अनुराग भोयर, येरखेडा चे सरपंच मंगला कारेमोरे ,माजी सरपंच मनीष कारेमोरे उपसरपंच शोभा कराळे ,खैरीचे माजी सरपंच किशोर धांडे , पोलीस पाटील बबन काळे, राजेश बनसिंगे, सुधाकर टोनपे, शरद भोयर, प्रवीण लुते, प्रदीप शेंडे, निर्मल वानखेडे ,भास्कर बनर्शिंगे , प्रवीण भायडे, भोजराज अंबादकर,सुभाष नेरलवार,अनिल मुप्पीड पवार , बाबा पुंजरवार, रमेश गवते, विकास दुरबुडे , मनोज तालेवार, सतीश भस्मे सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी