Published On : Wed, Oct 30th, 2019

वैज्ञानिक संशोधन स्थानिक भाषेत लोकांपर्यंत पोहचवा -भारताचे उपराष्ट्रपती एम. वैकेंया नायडू यांचे आवाहन

Advertisement

राष्ट्रीय संशोधन संस्थांनी आपले संशोधन प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित न ठेवता वैज्ञानिक संशोधनाचे निष्कर्ष तसेच त्यांची विस्तृत माहिती ही स्थानिक भाषेत लोकांपर्यंत पोहोचवल्यास अशा संशोधनाचा फायदा जास्त प्रमाणात लोकांना होईल असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती एम. वैकेंया नायडू यांनी आज नागपुरात केले.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी तर्फे आयोजित ‘ जीवशास्त्र, चिकित्सा व पर्यावरणात धातू आयन व कार्बोनिक प्रदूषके’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले , त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निरी चे संचालक डॉ. राकेश कुमार, परिसंवादाच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली खन्ना, अमेरिकेच्या मिसिसिपी येथील जॅक्सन स्टेट यूनिवर्सिटीचे प्राध्यापक पॉल टेक्नवोव तसेच राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे उपस्थित होते.

Gold Rate
19 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000/-
Gold 22 KT ₹ 1,22,800 /-
Silver/Kg ₹ 1,98,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे आरोग्य तसेच पर्यावरणीय आव्हाने यांच्यावर नवे उपाय सुचवण्या करिता असे परिसंवाद एक उत्तम व्यासपीठ आहे अशी भावना उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली. पर्यावरणीय प्रदूषण तसेच हवेच्या गुणवत्तेत होणारी घसरण हे देशापुढील मोठे आव्हान आहेत असे सांगून सरकारने राष्ट्रीय स्तरावर वायू प्रदूषणाला आळा घालण्याकरीता नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत 2024 पर्यंत हवेतील पार्टीक्युलेट मॅटरच्या प्रमाणात 20 ते 30 टक्के पर्यंत कपात करण्याचे उद्दिष्ट आखल्याचे त्यांनी सांगितले. भूजल तसेच वाहणारे पाणी यांच्यातील प्रदूषण खूप वाढले असून पाण्यातील अशुद्ध मेटल आयन नष्ट करण्यासाठी करण्यासाठी किफायतशीर उपाय योजना करणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. सर्व प्रकारच्या वैज्ञानिक उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्वाचा असतो, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

याप्रसंगी नीरीतर्फे ‘जागृती एक समाज एक लक्ष’ या लोकसहभागाधारित सार्वजनिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ देखील उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आला .या कार्यक्रमाअंतर्गत लुप्त झालेल्या नद्यांचे लोकसहभागाने पुनरुज्जीवन तसेच जलसाक्षरता व संवर्धन याविषयीचे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निरीतर्फे हाती घेतल्या जाणार आहेत. या परिसंवादादरम्यान हवेची गुणवत्ता व आरोग्य, कर्करोगावरील उपचार , पर्यावरणीय प्रदूषक व जोखिम मूल्यांकन , धातू आधारित नॅनोटेक्नॉलॉजी व टॉक्सिकॉलॉजी, मेटल आयन त्यातील बदल या संदर्भातील संशोधनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

परिसंवादाच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली खन्ना यांनी सदर परिसंवादातील संशोधनप्रबंध हे आंतरराष्ट्रीय पर्यावरण विज्ञान मासिकांमध्ये प्रकाशित होणार असल्याच सांगितल.

या परिसंवादाच्या उद्घाटनानंतर निरी परिसरातील स्मृती वन मध्ये नायडू यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. परिसंवादात देश विदेशातील विविध प्रतिनिधींचा सहभाग होता.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement