Published On : Mon, Sep 9th, 2019

मोटार सायकल च्या धडकेत ट्रक चालक मालक ठार

Advertisement

कन्हान : – कन्हान कडुन रामटेक कडे जाणाऱ्या मोटारसायकल चालकाने पायदळ धाब्यावर पाणी पिण्या करिता जाणाऱ्या ट्रक चालक मालकास जोरदार धडक मारल्याने उपचारार्थ नेताना रस्त्या तच पायदळी समीम अहमद याचा मुत्यु झाला.

रविवार (दि.८) ला नागपुर जबलपूर राष्ट्रीय महामार्गा वरील डुमरी स्टेशन शिवारातील पट्रोल पम्पवर ट्रक उभा करून ट्रक चालक मालक समीम अहमद राज बक्श वय ५० वर्ष रा. कोळशा खदान नं ६ हा सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान निरज धाब्यावर पाणी पिण्या करिता पायदळ जात असताना कन्हान कडुन रामटेक कडे जाणाऱ्या मोटार सायकल क्र एम एच ४० डी व्ही ३१४७ च्या चालकांला अंधारामुळे पायदळ व्यकती न दिसल्या ने मोटार सायकल ची जोरदार धडक लागुन पादचारी गंभीर जखमी झालेल्याने त्यास उपचारार्थ नेताना रस्त्यातच त्याचा मुत्यु झाल्याने ग्रामीण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे श्वविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले. कन्हान पोलीसांनी फिर्यादी मुलगा सलीम अहमद राज बक्श वय २५ वर्ष रा कोळशा खदान नं. ६ यांच्या तक्रारी वरून आरोपी मोटार सायकल चालक आकाश शिवरकर विरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत आहे .

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement