Published On : Mon, Sep 9th, 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शहरातील श्री गणेशाचे दर्शन

विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिली भेट

नागपूर, : शहरातील विविध भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन तेथे सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ हनुमान मंदीर येथील गणेश उत्सव मंडळ, झेंडा चौक येथील गणेश उत्सव मंडळ, संभाजीनगर येथील राजे संभाजी गणेश उत्सव मंडळ, अध्यापक लेआऊट येथील श्री गणेश उत्सव मंडळ, दिनदयाल नगर येथील नवचेतना गणेश उत्सव मंडळ, भेंडे लेआऊट येथील सार्वजनिक बालगणेश उत्सव मंडळ, एचबी इस्टेट येथील गणेश उत्सव मंडळ, पांडे लेआऊट येथील गणेश उत्सव मंडळ, प्रताप नगर येथील साहस गणेश उत्सव मंडळ, बजाजनगर येथील गणेश उत्सव मंडळ, तसेच धंतोली, वासवी मंदीर येथील तरुण गणेश उत्सव मंडळ येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले.

भेंडे लेआऊट येथील सार्वजनिक बालगणेश उत्सव मंडळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या जीवनामध्ये सुख-समृध्दी नांदू दे तसेच सर्वांच्या एकोपयाने या उत्सवाचा आनंद व्दिगुणीत होऊ दे अशी मागणी श्री गणेशाच्या चरणी केली.

एचबी टाऊन जुना पारडी नाका, संती गणेश उत्सव मंडळ, भारत क्रीडा मंडळ, तुळशीबाग रोड येथील गणपती उत्सव चॅरिटेबल ट्रस्ट तसेच कॉटन मार्केट येथील गणेश उत्सव मंडळांना भेट देवून तेथील श्रीगणेशाचे दर्शनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले.

Advertisement
Advertisement