Published On : Mon, Sep 9th, 2019

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून रक्तदान एक चळवळ राबविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावे :-पोलीस निरीक्षक देविदास कठाळे

कामठी :-, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून रक्तदान एक चळवळ समजून राबविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आव्हान जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी अली ग्रुपच्या वतीने हैदरी चौक येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले .

अली ग्रुपच्या वतीने करबला येथे शहीद झालेल्या इमाम हुसेन व अन्य सहकाऱ्याच्या स्मृतिदिनानिमित्त हैदरी चौक येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हेडकॉन्स्टेबल समाधान पांढरे ,कामरान हैदरी, घनश्याम चकोले ,पत्रकार वाजिद अली प्रामुख्याने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 265 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरात लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉ प्रीती बाबल , डॉ प्रवीण साठवणे, समयाला जबीन, यांच्या चमूने रक्तसंकलन केले तर रक्तदान शिबीराचे यशस्वीतेसाठी कामरान जाफरी, हसंन अली, नजर हैदरी, राहील जफरी ,अजगर हुसेन माईल हुसेन, हसंन अली , मंजूर हसन पत्रकार वाजिद अली आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.

संदीप कांबळे कामठी