Published On : Thu, Mar 19th, 2020

परिवहन समितीतर्फे ३०४.१७ कोटी उत्पन्नाचा प्रस्तावित अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सुपूर्द

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीर्फे ३०४ कोटी १७ लक्ष उत्पन्नाचे प्रस्तावित अंदाजपत्रक गुरूवारी (ता.१९) स्थायी समितीकडे मंजुरीकरीता सुपूर्द करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्याकडे प्रस्तावित अंदाजपत्रक सुपूर्द केले. याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती व सदस्य प्रदीप पोहाणे, स्थायी समिती सदस्या मनिषा धावडे, वैशाली रोहनकर, विशाखा बांते, प्रमिला मंथरानी, आशा उईके, गार्गी चोपरा, सदस्य राजेश घोडपागे, अनिल गेंडरे, संजय बुर्रेवार, दिनेश यादव, विक्रम ग्वालबंशी, प्रमोद कौरती, संजय चावरे, नागेश मानकर, नरेंद्र वालदे, परिवहन समिती सदस्य नितीन साठवणे, परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, हरीश राउत, स्नेहा करपे, किरण बगडे, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिपरुडे, विनय भारद्वाज आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

परिवहन समितीचे प्रस्तावित अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करताना समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर म्हणाले, २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदापत्रक ‘ब’चे उत्पन्न ३०३ कोटी ९० लक्ष अपेक्षित असून सुरूवातीची शिल्लक २६ लक्ष ९७ हजार अपेक्षित धरून एकूण उत्पन्न ३०४ कोटी १७ लक्ष हे अपेक्षित उत्पन्न गुहित धरता या आर्थिक वर्षात ३०४ कोटी ०१ लक्ष खर्च होईल. त्यामुळे मार्च २०२१ अखेरची अपेक्षित शिल्लक १६ लक्ष ४२ हजार एवढी राहिल.

प्रवाशांना आदर्श व कार्यक्षम ‘आपली बस’सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने २०२०-२१ या वर्षात ९५ स्टँडर्ड बस, १०० डिझेल इंधन बसेस सी.एन.जी.मध्ये रूपांतरीत तसेच १५० मिडी बस, ४५ मिनी बस, ६ इलेक्ट्रिक चार्जींगवर चालणा-या मिडी बस तसेच केंद्र शासनाकडून प्राप्त होणा-या ४० इलेक्ट्रिक चार्जींगवरील बसेस अशा एकूण ४३६ बसेस कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

शहर बस थांब्यालगत ‘वाटर एटीएम’
शहरातील प्रवाशांच्या सुविधेकरिता नागपूर शहरातील प्रमुख बस थांब्यालगत ‘वाटर एटीएम’ लावण्यात येणार आहे. शहर बस थांब्यालगत ‘वाटर एटीएम’ करिता १ कोटीची तरतुद करण्यात आली आहे. याशिवाय नागपूर शहर हद्दीत व ग्रामिण भागात जाणा-या शहर थांबण्याच्या नियोजित जागेवर ‘बस थांबा’ असे फलक लावण्यात येणार आहे. या बस थांब्याकरिता अर्थसंकल्पात १ कोटीची तरतुद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात सुधारणा व फेरफारीचे अधिकार स्थायी समितीला
परिवहन समितीद्वारे स्थायी समितीकडे प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मनपाच्या २०२०-२१च्या अर्थसंकल्पामध्ये आवश्यक सुधारणा व फेरफार करण्याचे अधिकार स्थायी समिती सभापतींना देण्यात यावे, अशी सुचना यावेळी माजी स्थायी समिती सभापती व सदस्य प्रदीप पोहाणे यांनी केली. प्रदीप पोहाणे यांच्या सुचनेला बैठकीमध्ये बहुमताने मंजुरी प्रदान करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement