Published On : Thu, Mar 19th, 2020

आता ‘आपली बस’मध्ये क्षमतेएवढेच प्रवासी

Advertisement

परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे निर्देश : अतिरिक्त प्रवाशांवर निर्बंध

Aapli Bus

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’मध्ये बसमध्ये जेवढी आसन क्षमता आहे तेवढेच प्रवासी बसविण्यात यावेत. आसन क्षमतेपेक्षा एकही अतिरिक्त प्रवासी बसमध्ये घेण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिले.

Gold Rate
16 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000 /-
Gold 22 KT ₹ 1,22,800 /-
Silver/Kg ₹ 1,91,300/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुरूवारी (ता.१९) परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी मोरभवन येथील बसस्थानकाला आकस्मिक भेट दिली. यावेळी मनपाचे परिवहन विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी ‘आपली बस’च्या वाहक चालकांशी संवाद साधला. ‘कोरोना’च्या संरक्षणाच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात यावी. ‘कोरोना’च्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. बसमध्ये गर्दी होणार नाही याची विशेष खबरदारी घेत अतिरिक्त प्रवासी टाळावेत. आसन क्षमतेव्यतिरिक्त कोणताही प्रवासी उभ्याने प्रवास करणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

याशिवाय वाहक व चालकांनी नियमीत मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करावा. स्वत:सह इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement