Published On : Wed, Jan 24th, 2018

मुख्यमंत्र्याच्या शहरातील शोकांतिका महापौरांना अंधारात ठेवले म.न.पा उपदव्याप शांततेच्या ठिकाणी नांदणार अशांतता: युवक काँग्रेसचे आंदोलन

Advertisement


नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात व पूर्व नागपूर विधानसभा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय घाटोले व निखिल वांढरे यांच्या नेतृत्वात नागपूर महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयातील बगिच्यात योगा व मॉर्निग वॉक करून अभिनव आंदोलन केले व प्रशासनाचे लक्ष वेधले. जनतेमधुन याबाबत प्रचंड प्रमाणात रोष आहे व विरोध आहे.

नगरसेवक बंटी शेळके म्हणाले आजच्या धकाधकीच्या व तनावग्रस्त परिस्थितीत आपण ताण घालविन्यासाठी सकाळ संध्याकाळ नागरिक बगिच्यात आपले नियमित व्यायाम करुन ताण कमी करतात. पण आता मनपा जाहिरातिचा उपदव्याप करून गोंगाट निर्माण केला. मनपाचे ईतरही आर्थिक स्त्रोत आहे. पण उद्यान मधे जाहिरात करून पैसे कमविण्याचा जावई शोध लावला.यांना मूलभूत सुविधाची चिंता नाही प्रत्येक उद्यानात पिण्याच्या पाण्याची समस्या,शौचालये,व इतरही समस्या कड़े लक्ष न देता उद्यानामधे ध्वनि प्रदूषण करीत आहे. मा. उच्च न्यायालयाचे ध्वनि प्रदूषण बाबत कड़क आदेश असतांना असे करणे म्हणजे उच्च न्यायालयाचा अपमान आहे. पैशाच्या लोभापायी नागरिकाची शांतता भंग करणारे नागपूर महानगर पालिकेतिल सत्ताधाऱ्यानी मनपा चे उद्यान खाजगी कंत्राटदाराच्या ताब्यात देऊन आपल्या पक्षाचे कार्यक्रम राबवितात.

या सीमेंटच्या जंगलात बगिच्याच्या रूपाने मीळणारी शांतता व शुद्ध ऑक्ससिजन यावर ही कर लावण्यासारखा प्रकार आहे.

मनपाने गार्डन मधे जाहिराती करून आर्थिक स्रोत वाढविले म्हणजे दाँत कोरुन पोट भंरण्यासारखे आहे. आवश्यक कामाबाबत उदासीन धोरण आहे. त्यावर काम करण्यापेक्षा फालतू कामावर पैशाची उधलपट्टी करून मनपाची तिजोरी रिकामी करून ठेवली करदात्याच्या पैशाचा दूरपयोग करून राहिली आहे. मनपा चा हा प्रस्ताव अयोग्य आहे ह्यासाठी एवढी आग्रही का ? या प्रस्तावाचा नागपूर लोकसभा युवक काँग्रेस निषेध करीत आहे. आता प्रश्न पडला आहे की वृद्धांनी शुद्ध ऑक्ससीजन घेण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी कुठे जावे. त्यापेक्षा नागरिकांना सुविधा पुरवा व नैसर्गिक सौंदर्य नष्ठ करू नये व दूसरे म्हणजे उद्यानाच्या आजुबाजुला राहणाऱ्या विद्यार्थावर याचा परिणाम होणार आहे. आणि नागरिकांचा विरंगुळा ही नष्ठ करीत आहे. स्पीकरवर जाहिराती करण्यासाठी मनापातील सत्ताधारी एवढे आग्रही का आहे ? व आपल्या मर्जितल्या सुपर अँडवस्टाईजीग कंपनी ला दिलेला कंट्रात रद्द करावा या बाबत नगरसेवक बंटी शेळके आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते महापौरांन कड़े गेले असता हा प्रकार महापौरांच्या लक्षात आणून दिला तेव्हा दस्तूरखुद्द महापौरांना याबाबत कसलिच माहिती नाही हा धक्का दायक प्रकार आहे महापौरांनी उद्यान अधीक्षक यांना बोलवले असता त्यांनी सांगितले हा ठराव स्थायी समिति ने मंजूर केला महापौरांना अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय हा उघड़ उघड़ भ्रष्टाचार आहे.

महापौरांनी याबाबत खुलासा मागितला व नाराजी दर्शविली बंटी शेळके यांना म्हणाल्या मी स्वतः प्रत्येक उद्यानात जाऊंन जनतेची प्रतिक्रिया घेते व हा ठराव नामंजूर करते मनपातील अधिकाऱ्यांचा प्रताप बघा प्रथम नागरिक महापौरांना अंधारात ठेऊन निर्णय घेऊन राहिले आहे ही शोकांतिका आहे. महापालिका कोन चालवित आहे हा प्रश्न चिन्हच आहे ? नागपूर महानगर पालिकेला जाहिरातीसाठी उद्यानाची जागा ही कमी पडली आहे. मनपा च्या मनमानी कारभाराविरोधात नागपूर लोकसभा युवक काँग्रेसनी यलग्गार पुकारला असून जो पर्यन्त हा प्रस्ताव मागे घेत नाही. तो पर्यन्त आंदोलन सुरुच ठेऊ असे बंटी शेळके म्हणाले आजच्या या आंदोलनात नागपूर शहर कॉग्रेस कमेटिचे महासचिव हसमुख सागलानी,नावेद शेख,अक्षय घाटोले, निखिल वांढरे,जयसिंह चव्हाण,राजेंद्र ठाकरे, वसीम शेख,फरदीन खान, तुषार मदने,गुड्डु भाई, श्री शिर्के,रिज़वान खान,फजलुर कुरेशी,शेख रियाज, संजय बालानी, राहुल खांडेकर,नीलेश देशभरतार, निखिल वानखेड़े, बाबू खान,रजत खोब्रागडे, सुरेश कदम,हेमंत कातुरे, पूजक मदने, रवींद्र उइके, अप्पू उइके, सम्यक खोब्रागडे, हर्षल बहादुले, नितिन गुरव, मन मेश्राम, इरफान शेख, शुभम वांढरे इत्यादी उपस्थित होते.