Published On : Wed, Jan 24th, 2018

दोंडाईचा सोलर पार्क प्रकल्प: 199 हेक्टर जमिनीचा सानुग्रह, अनुदानाचा प्रस्ताव तयार करा

Advertisement

Maharashtra Energy Minister Chandrashekhar Bawankule
मुंबई: धुळे जिल्हयातील दोंडाईचा सोलर पार्क या प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीपैकी 199 हेक्टर जमिनीसाठी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज संबंधीत शासकीय यंत्रणेला दिले.

सन 2009 मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला होता. तेव्हापासून या प्रकल्पाबाबत काहीच निर्णण घेतला गेला नाही. विद्यमान महाराष्ट्र शासनाने याबाबत निर्णय घेऊन प्रकल्पाला गती दिली. या प्रकल्पासाठी 824 हेक्टर जमीन घेण्याचे निश्चित करण्यात आले. मेथी आणि विकरण गावातील शेतकऱ्यांची 675 हेक्टर खाजगी जमिनीही या प्रकल्पासाठी निश्चित झाली. 149 हेक्टर शासकीय जमिनही या प्रकल्पासाठी घेण्यात आली.

खाजगी आणि शासकीय मिळून या प्रकल्पासाठी 529 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यापैकी 476 हेक्टर खाजगी व 45 हेक्टर शासकीय जमिनीचा समावेश आहे. सन 2012 मध्ये 476 हेक्टर जमिनीचा मोबदला नियमानुसार 47.60 कोटी देण्यात आला. उर्वरीत 199 हेक्टर जमीन गेलेल्या 138 शेतकऱ्यांना वाढीव मोबदला हवा होता. या शेतकऱ्यांनी नियमानुसार महसूल विभागाच्या भूसंपादनाच्या कलम 18 नुसार आपली मागणी न्यायालयाकडे नोंदवायची होती. पण कुणीच कलम 18 नुसार वाढीव मोबदल्याची मागणी केली नाही.

Gold Rate
29 May 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver/Kg 98,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आज झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत 199 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्ताव तयार करावयाच्या सूचना महानिर्मितीला दिल्या. त्यानुसारच येत्या आठ दिवसात या शेतकऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा सकारात्मक निर्णय शासन घेत आहे. कोरडवाहू जमिनीसाठी जो मोबदला दिला जाईल. त्यापेक्षा दीडपट मोबदला हंगामी बागाईतदारांसाठी तर दुप्पट मोबदला बागाईतदार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. तसेच पहिल्या खरेदीच्या दिनांकापासून आतापर्यंत या रक्कमेवर व्याजही देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रधान सचिव, अरविंद सिंग, महानिर्मिती व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement