Published On : Sat, Feb 17th, 2018

अॅट्रॉसिटी चित्रपटाची टीम दीक्षाभूमिवर

Advertisement

नागपुर: देशातील चित्रपट सृष्टि मधे पहिल्यांदाच अॅट्रॉसिटी या विषयावर नागपुरातील कलावंत डॉ.राजेन्द्र पडोळे यानी पुढाकार घेऊन अॅट्रॉसिटी या चित्रपटाचे निर्माण केले हा चित्रपट येत्या 22 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे,यापूर्वी या चित्रपटातील निर्माते राजेन्द्र पडोळे,अभिनेता रिषभ पडोळे निर्देशक दीपक कदम,मार्केटिंग क्रिएटिव पराग भावसार यांनी दीक्षाभूमिला भेट दिली व भगवान बुद्ध तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन आशीर्वाद घेतले या प्रसंगी बहुजन सेना चे अध्यक्ष सागर डबरासे व प्रभारी प्रफुल मानके बसपा नेते विवेक हाडके यांनी या टिमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना चित्रपट यशस्वी होण्याच्या सुभेच्छा सुद्धा दिल्या.

याप्रसंगी बहुजनसेना चे अध्यक्ष सागर डबरासे म्हणाले कि ज्या प्रकारे महाराष्ट्रात आज जातीय द्वेशाच्या भावणेतून समाजात संघर्ष निर्माण होत आहे जसे की भिमा-कोरेगावची घटना यांचे उदाहरण आहे काही जातीयवादी लोकांनी भिमा-कोरेगाव येथे जनिवपूर्वक दंगल घडउन मराठा व दलित समाज यांच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न केला पन हे जातीयवाद्यांचे षड्यंत्र दोन्ही समाजातील वैचारिक लोकांनी समजून त्यांचा डाव हानून पाडला

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पृष्ठभूमिवर अॅट्रॉसिटी हा मराठी चित्रपट शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेबाना माननारा वर्ग या दोन्ही वर्गामधे सांमजस्य निर्माण करुण महाराष्ट्रातिल पुरोगामी चळवळ बळकट करण्यासाठी उपायकारक ठरेल या चित्रपटाची कथा मराठा समाज आणि दलित समाजला एकत्रित आनण्याचे तसेच अॅट्रॉसिटी बद्दल च्या गैरसमजुती व अॅट्रॉसिटी चे महत्व समजविन्याचे प्रयत्न या चित्रपटाद्वारे निर्मात्यानी केले आहे वरुण या चित्रपटाचे कलावंत नागपुर नगरीतील असल्यामुळे चित्रपटाचे ट्रेलर मि बघितले आहे खुप सुंदर कथा आणि गानी आहेत जनतेनी हा चित्रपट नक्कीच बघावा
असे आव्हाहन सागर डबरासे यांनी केले.

Advertisement
Advertisement