Published On : Fri, Sep 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात साजरा होणाऱ्या ‘तान्हा पोळा’ सणाला लाभली २१७ वर्षाची परंपरा ; ‘हा’ आहे इतिहास

Advertisement

नागपूर: बैल पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या तान्हा पोळा सणालाही नागपुरात अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण हा सण नागपूरसह केवळ विदर्भातच साजरा केला जातो.

मात्र, पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा गेल्या २१७ वर्षांपासून आजही सुरू असून लहान चिमुकल्यांसाठी आनंदाची चंगळ घेऊन येतो.

Gold Rate
01 Aug 2025
Gold 24 KT 98,100 /-
Gold 22 KT 91,200 /-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,10,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आजच्या दिवशी लहान मुले लाकडापासून तयार केलेल्या नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते. शहरात ठिकठिकाणी लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा तान्हा पोळा भारावला जातो. त्यासाठी लाकडांपासून तयार करण्यात आलेले नंदी बैल घेऊन चिमुकले एकत्र होतात. त्यानंतर कोणाचा बैल आकर्षक असतो त्याला बक्षीस दिले जाते.

हा आहे इतिहास :दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा सण साजरा करण्याची सुरुवात केली.ही प्रथा पहिल्यांदा नागपुरातच सुरू झाली. तेव्हापासून लहान मुले लाकडी नंदी बैलांचा पोळा साजरा करतात. विदर्भ वगळता कुठेच हा सण साजरा केला जात नाही. सन १८०६ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी हा उत्सव सुरू केला. आता या परंपरेला २१७ वर्ष पूर्ण होत आहेत.

Advertisement
Advertisement