Published On : Wed, Sep 9th, 2020

स्थायी समिती अध्यक्षांनी एम्स येथील व्यवस्थेची पाहणी केली

Advertisement

कोव्हिड संदर्भातील परिस्थितीचा घेतला आढावा

नागपूर: कोव्हिड संदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवार (ता.९) स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री.विजय (पिंटू) झलके यांनी मिहान येथील एम्स, नागपूर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयासंदर्भातील प्रशासनाला येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक डॉ.रविन्द्र भोयर, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, एम्सच्या संचालक मा.डॉ. विभा दत्ता, डॉ. मनिष श्रींगिरीवार, डॉ.अविनाश यादव, डॉ.अरविंद कुशवाह आदी उपस्थित होते.

एम्स चे संचालक डॉ.विभा दत्ता यांनी माहिती दिली की, एम्समध्ये सद्या ५० बेडची व्यवस्था असून अजुन ३० बेडची व्यवस्था मनपा तर्फे करण्यात येत आहे. अशे एकूण ८० बेडची सेवा सुरु करण्यात येत आहे.

त्यांनी यावेळी सांगितले की कोरोना प्रादुभावामुळे एम्ससाठी देण्यात आलेले काही डॉक्टर हे शासनाने दुसरीकडे पाठविण्यात आले आहे त्यामुळे एम्स येथे सद्या डॉक्टरची कमतरता असल्यामुळे येथील नेमण्यात आलेल्या डॉक्टरांना एम्समध्ये परत पाठविल्यास याठीकाणी रुग्णांना योग्य सेवा देता येईल. तसेच याठिकाणी रुग्णांना ऑक्सीजनची सद्या असलेली व्यवस्था अपूरी पडत असल्यामुळे पुरेशी व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

मा.स्थायी समिती अध्यक्ष श्री. झलके यांनी येथील व्यवस्थेची पाहणी करुन माहिती घेतली व असलेल्या व्यवस्थेबददल समाधान व्यक्त केले. तसेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरीता एम्सला आवश्यक ते सर्व सहकार्य महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.