Published On : Wed, Sep 9th, 2020

जिल्ह्यात आज 1105 रुग्णांना डिस्चार्ज

1319 पॉझिटिव्ह तर 59 मृत्यू

नागपूर : जिल्ह्यात आज 1105 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले. 1319 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (44556) झाली आहे. आता पर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 31566 झाली आहे.

एकूण क्रियाशील 11532 रुग्णापैकी 7045 गृह विलगिकरणात आहेत. आज 59 मृत्यू झाले असून त्यापैकी 5 जिल्ह्याबाहेरील मृत्यू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.84 टक्के एवढे आहे.