Published On : Sat, Oct 16th, 2021

रिपब्लिकन पक्षाच्या गटातटाच्या स्वार्थी नेत्यांनी चळवळीच्या कार्यकर्तांची वाट लावली

– नारायण बागडे चे प्रतिपादन

नागपूर – आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडेनी आपले विचार व मत व्यक्त करते वेळी तो काळ आजपण आठवतो न आमच्या कोणी मंत्री होता न आमदार न खासदार तरीसुद्धा आंबेडकरी चळवळीला सोन्याच्ये दिवस होते.

Advertisement

चळवळीचे कार्यकर्ते आपल्या घराच्या ताटात दोन भाकरीचे तुकडे खावून स्वयंम स्फूर्ती ने चळवळीला आपल्या खांद्यावर घेऊन अन्यायाविरुद्ध लढा देत होते. पंरतु जेव्हा पासून रिपब्लिकन पक्षाच्या स्वार्थी नेत्यांना राजकारणाची चटक लागली तेव्हा पासून चळवळीतील कार्यकर्ते यांची वाट लावली.

Advertisement

असे प्रतिपादन नारायण बागडे यांनी केले. ते धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय कार्यकर्ता मेळाव्यात दिवंगतअनुप थुल सभा मंचवरून बोलत होते.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुखदेव उर्फ मामासाहेब मेश्राम होते तर उदघाटक चळवळीचे आधार स्तंभ अँड.सुरेश घाटे, प्रमुख पाहुणे माजी सनदी अधिकारी नामदेवराव निकोसे, नागपूर, राष्ट्रीय महासचिव उद्धव तायडे, मुंकूद गौतम दिल्ली, गाईत्री चव्हाण गुजरात प्रदेश, चंद्रकांत सोनवणे औरंगाबाद, अजय तायडे जळगाव, अलका जगताप ठाणे, कविता गाडगे पुणे, किरण डोक्रस पुणे, ओबीसी नेते राजुदादा पांजरे नागपूर, सुरेश कपूर, राहूल रामटेके अमरावती, सुरेंद्र बिंदोड यवतमाळ, सहारे साहेब मध्य प्रदेश, सुदर्शन वाल्मिकी मोर्चा अध्यक्ष सुभाष बढेल, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे हे होते. कार्यक्रमाच्ये सुत्र संचालन प्रा.रमेश दुपारे तर आभार प्रदर्शन शालिक बांगर यांनी केले प्रमुख पाहुणे यांचे स्वागत प्राचार्य के.एस.पानतावणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामभाऊ वाहणे, के.टी.कांबळे, मधूकर सदमाके, हंसराज उरकुडे, पंकज पाटील, नरेश खन्ना, पंढरी बागडे यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement