Published On : Sat, Oct 16th, 2021

बसपाने दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले

65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्ताने आज बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संविधान चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश बसपा चे महासचिव नागो जयकर, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, महिला नेत्या रंजनाताई ढोरे यांच्या नेतृत्वात अभिवादन करून एका रॅलीद्वारे बसपा नेते व कार्यकर्ते यांनी दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना व तथागत बुद्धांना वंदन केले.

14 व 15 ऑक्टोबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी निमित्ताने दोन्ही दिवस बसपा द्वारे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. संविधान चौकात बाबासाहेबांना अभिवादन केल्यावर बसपा कार्यकर्ते *”धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू हो, संविधान के सम्मान मे BSP मैदान मे, महापुरुषो के सम्मान मे बीएसपी मैदान मे, बाबा आपका मिशन अधुरा बीएसपी करेगी पुरा, बीएसपी की क्या पहचान नीला झेंडा हाथी निशान, बहनजी संघर्ष करो हम आपके साथ है”* आदी घोषणा देत-देत रॅलीद्वारे नागपूर विद्यापीठ, महाराजबाग, विद्यापीठ ग्रंथालय, अलंकार टॉकीज चौक मार्गे काछिपुरा चौकातून रैली दीक्षाभूमीवर पोहचली.

याप्रसंगी जिल्हा प्रभारी विजयकुमार, सुनंदाताई नितनवरे, सुरेखाताई डोंगरे, प्रा करुणाताई मेश्राम, मायाताई उके, राजकुमार बोरकर, अभिलेश वाहाने, चंद्रशेखर कांबळे, संजय जयस्वाल, गौतम गेडाम, सदानंद जामगडे, नितीन वंजारी, शशिकांत मेश्राम, अभय डोंगरे, प्रवीण पाटील, वीरेंद्र कापसे, प्रकाश फुले, सुरेंद्र डोंगरे, सहदेव पिल्लेवान, संजय सोमकुवर, शिशुपाल नितनवरे, विलास पाटील, शंकर थुल, उमेश मेश्राम, आदेश रामटेके, सचिन कुंभारे, विलास मून, चंद्रमणी गणवीर, राष्ट्रपाल पाटील, भानूदास ढोरे, विकास नारायने, राकेश गजभिये, प्रताप तांबे, जगदीश गेडाम, सुमित जांभुळकर, अनिल मेश्राम, निरंजन जांभुळे, संगीत इंगळे, सुनील सोनटक्के, संभाजी लोखंडे आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.