Published On : Mon, Jul 23rd, 2018

दि.२ सप्टेंबर ला मुंबईत शेतकऱ्यांची गोलमेज परिषद

Advertisement

संपूर्ण राज्यात व देशात शेतकऱ्याची परिस्तिथी bjp सरकारने दयनीय केली आहे. शेतकर्यांच्या मालाला भाव मिळत नाही, msp च्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. संपूर्ण देशात msp प्रमाणे शेतमाल खरेदी करण्याची सरकारी यंत्रणा उपलब्ध नाही. जिथे कुठे काही प्रमाणात शेत मालाची खरीदी झाली, त्या शेतकऱ्यांचे चुकारे वर्ष वर्ष होत नसल्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव कमी भावात बाहेर बाजारपेठेत माल विकतो. एक वर्षापूर्वी केलेली कर्ज माफी अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

अनेक जाचक अटी टाकून मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे. कायमची नापिकी, शेतमालाला भाव न मिळणे सरकारचे फसवे धोरण आणि वाढती महागाई याला कंटाळून राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची ३४ हजार कोटी कर्जमाफी करण्यास सरकार कडे पैसा नाही, परंतु अडाणी अंबानी यांचे सात लक्ष कोटीचे कर्ज माफ करते, म्हणजेच हे सरकार केवळ मोठ्या उद्दोगपत्यांचे आहे हे सिध्द होते.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एकूणच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे आम आदमी पार्टी सुरवातीला २ सप्टेंबर २०१८ ला राज्यव्यापी शेतकरी गोलमेज परिषद घेत आहे. या परिषदेला राज्यातील सर्व शेतकरी प्रश्नावर कार्य करणारे नेते, संशोधक, शेतकरी उपस्थित राहतील. या परिषदेमधून शेतकरी प्रश्नावर कृती आरखडा तयार केला जाईल, त्यानुसार कार्यक्रम राबविल्या जात्तील.

मी पार्टीत प्रवेश केल्यापासून मागील सहा महिन्यात राज्याचा दोन वेळा दौरा केला, मागच्या महिन्यात राज्य कार्यकारिणीची घोषणा झाली, त्यानंतर जवळपास ९० विधानसभा समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. ३० सप्टेंबर पर्यंत राज्यातील सर्वच विधानसभा, तालुका समित्या गठीत होतील. तसेच येणाऱ्या काही दिवसात जिल्हा समित्या गठीत करण्यात येतील.

दि.१५ आगस्ट पासून राज्यात जनसंपर्क यात्रा चालू करण्यात येईल. या सोबत राज्यात सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे, पुढील ३ महिन्यात २५ लाख सभासद नोंदणीचे लक्ष आहे, ते पूर्ण केल्या जाईल. या दरम्यान दिल्लीत जनहिताचे जे कार्य चालू आहेत, जसे – दर्जेदार सरकारी शिक्षण, दर्जेदार आरोग्य सेवा, स्वस्त विज, मोफत पाणी, सरकारी हमीवर उच्च शिक्षणासाठी कर्ज इतर कार्याचा प्रचार प्रसार करण्यात येईल.

आम आदमी पार्टी आता राज्यातील सर्वच निवडणुका लाढणार आहोत, त्याची संपूर्ण तयारी आमच्या कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे.

या प्रेस कांफ्रेंस मध्ये डॉ देवेंद्र वानखडे, जगजीत सिंग, कविता सिंघल, एड. सी.एच. शर्मा, अंबरीश सावरकर, सुनील बांते, शंकर इंगोले, डॉ. अशोक लांजेवार, गीता कुहीकर, संजय जीवतोडे, अन्सार शेख, सचिन सोमकुंवर, जोशी, स्वप्नील सोमकुंवर, अशोक मिश्रा उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement