कामठी : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा मार्गावर कामठी कडे जेवणासाठी जात असलेल्या भिलगावच्या दोन दुचाकीस्वार तरुणांना अज्ञात चार दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर त्यांच्याकडील दोन मोबाईल किमती 10 हजार रुपये व नगदी 4 हजार 500 रुपये असा एकूण 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुबाडणुक केल्याची घटना गतरात्री अकरा दरम्यान घडली.यात लुबाडणूक झालेल्या पीडित तरुणाचे नावे सुमितकुमार दशरथ भालेराव वय 30 वर्षे ,राहुल दीपक गणवीर वय 30 वर्षे दोन्ही राहणार भिलगाव कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दोन्ही तरुण हे कामठी येथील ताज हॉटेल मध्ये जेवण करण्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार गतरात्री 10 च्या नंतर बजाज कंपणीची दुचाकी सी टी -100, एम एच 40 बी एस 4071 ने डबल सीट भिलगाव -वरून चौपदरी मार्ग ओलांडून रणाळा मार्गे जात असता
या रस्त्याच्या उताराजवळ दडी मारून बसलेल्या चार तरुणांनी गाडीला थांबवून दुचाकीचालक सुमितकुमार भालेराव याच्या पोटाला चाकू लावून याच्या खिशातील नगदी 500 रुपये व 5000 रुपये किमतीचा रेडमीन 06 प्रो कंपनीचा मोबाईल तसेच सहपाठी मित्र असलेला राहुल गणवीर यांच्या खिशातून नगदी 4 हजार रुपये व 5 हजार रुपये किमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल असा एकूण 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमालासह दुचाकीची चाबी सुद्धा बळजबरीने घेऊन पळ काढल्याची घटना घडली
घटनेची माहोतो मिळताच नवीण कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळा ची पाहणी करोत अज्ञात लुबाडणूक करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला मात्र अपयश अभावी पोलिसांना खाली हात परतावे लागले.यासंदर्भात फिर्यादि सुमितकुमार भालेराव यांनी स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 392, 34 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी