Published On : Tue, Jun 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

योग्यवेळी योग्य निर्णय होईल; महागाईवरून शरद पवारांचा सरकारला इशारा,देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Advertisement

नागपूर – देशात आणि राज्यात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. पेट्रोल-डिझेल दरांनंतर आता एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुमारे 29 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार अधिक वाढला आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

शरद पवारांचा सरकारवर निशाणा-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत इशारा दिला आहे. वाढती महागाई थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करत असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“महागाई नियंत्रित केली जात आहे असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ती टप्प्याटप्प्याने वाढत आहे. या निर्णयांची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी मोजावी लागेल,” असे पवार यांनी म्हटले आहे.

फडणवीसांचे प्रत्युत्तर-
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा संदर्भ दिला आहे. जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये इंधन दर वाढले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

“जगात असा एकही देश नाही जिथे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढलेल्या नाहीत. केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील,” असे फडणवीस यांनी सांगितले.

अल निनोचा पावसावर परिणाम-
याच वेळी मान्सूनवर अल निनोचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. राज्यात यंदा सरासरी 92 टक्के पावसाचा अंदाज असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता भासू शकते, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कमी पावसामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

महागाई आणि पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय चर्चा अधिकच तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.