Published On : Wed, Jun 13th, 2018

राजस्व अभियान शिबीर आमडी येथे संपन्न.

Advertisement

कन्हान : -ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जुन महिन्यात हातातील कामे बाजुला करून विविध दाखल्यांसाठी धावपळ करावी लागते . तेव्हा त्यांना गावातच ही सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने नायब तहसिलदार प्रदीपकुमार आडे यांच्या नेतृत्वात मंगळवार दि.१२ जुन ला आमडी येथे राजस्व शिबीर संपन्न झाले.

तहसिल कार्यालय पारशिवनी व्दारे ग्राम पंचायत आमडी येथे मंगळवार दि.१२ जुन २०१८ ला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत मा. राम जोशी साहेब उपविभागीय अधिकारी रामटेक व तहसिलदार मा.वरूनकुमार सहारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार मा. प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात राजस्व अभियान २०१८ राबविण्यात आले. यात आमडी ग्राम पंचायतीच्या नागरिकांना ७/१२ वाटप – १६४, ८अ- १३२, वारस फेरफार- ०४, इतर फेरफार -३२, सुविधा केंद्र उत्पन्न दाखले -१०, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना – ०८, ग्राम पंचायत विभाग विवाह नोदणी प्रमाणपत्र -०२, ग्रा.प रहिवासी प्रमाणपत्र -६७, जन्म, मुत्यु दाखले – ०१, तलाठी उत्पन्नाचे दाखले -७९, सिंचन विहीरी नोंदणी – ०२, जातीचे प्रमाणपत्र (सेतु) ऑनलाईन – ९७ , उत्पन्नाचे प्रमाणपत्र (सेतु) ऑनलाईन – १०५, शपतपत्र – ९६, शिधापत्रिका नाव कमी /जास्त करणे प्रकरण – ३७, दुय्यम शिधापत्रिका – ०९, पोलीस पाटील प्रमाणपत्र – ११, सेतु केन्द्राकडे ८० आधारकार्डची नोंदणी करण्यात आली.

ग्राम पंचायत आमडी येथे राजस्व अभियान २०१८ यशस्वी करण्यात आले. या शिबिराचा गावातील नागरिकांनी लाभ घेतला. या शिबीरांच्या यशस्वीते करिता नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे, मंडळ अधिकारी बी जी जगधाने , तलाठी- बिसने , पालांदुरकर , योगिता काळे, शितल गौर, पुरवठा अधिकारी कु. तितीशा बारापात्रे , कोतवाल- सुधिर चौव्हाण,सेवक वाघाडे, सं गां यो विभाग – श्री लुटे , पोलीस पाटील – मजुंषा मायवाडे, सरपंच – जिवलग चव्हाण, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, कर्मचारी व शाशकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले.