Published On : Thu, Nov 16th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील ‘या’ नेत्यांच्या खांद्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी!

Advertisement

नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना नागपूर-विदर्भातील नेत्यांच्या खांद्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे.

भाजपने बऱ्याच आधी नागपूर-विदर्भातील नेत्यांवर मतदारसंघांची जबाबदारी दिली. नेत्यांनी नियमित दौरे करून निवडणुकीसाठी सर्व तयारी केली. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख प्रचारक आहेत. आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, आकाश फुंडकर , परिणय फुके , आमदार मोहन मते, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचा सहभाग आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेसकडून कमलनाथ मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार मानले जातात. त्यांचे विश्वासू माजी मंत्री सुनील केदार समन्वयक असून ठाण मांडून बसले आहेत. कमलनाथ यांच्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खास टीम पाठवली. चंद्रकांत हंडोरे निरीक्षक आहेत. छिंदवाडा जिल्ह्यात आमदार विकास ठाकरे, आमदार राजू पारवे, आमदार अभिजित वंजारी, एस. क्यू. झमा, चंद्रकांत वासनिक, हुकुमचंद आमधरे, राजेश निंबाळकर, धीरज लिंगाडे, नाना गावंडे आदी काँग्रेस नेते कामाला लागले आहे.

अनीस अहमद, हैदरअली दोसानी, तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर यांच्यासह अन्य महिला नेत्याही समन्वय साधण्यात व्यस्त आहेत. तेलंगणाचे काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आहे. प्रदेश सचिव संदेश सिंगलकर तेलंगणाच्या वॉर रुमचे सहप्रभारी आहेत. मध्य प्रदेशात रामकिशन ओझा यांच्याकडे पक्षाध्यक्षांच्या प्रचारसभांच्या समन्वयाची जबाबदारी आहे. प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे राजस्थानच्या मीडियाचे प्रमुख म्हणून काम हाताळत आहेत.

Advertisement
Advertisement