अमरावती : चांदूर रेल्वे मार्गावर एसआरपीएफ कॅम्प नजीक वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना गुरूवारी सकाळी निदर्शनास आली.
मागील काही दिवसांपासून जंगलनजीकच्या रस्त्यांवर बिबट्यांचा सुरु आहे. हे पाहता आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास एसआरपीएफ कॅम्प नजीक एक बिबट मृतावस्थेत आढळून आला.
या मादी बिबट्याचे वय अंदाजे अडीच वर्षांचे आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.