Published On : Tue, Feb 11th, 2020

मेट्रो रिजनमधील घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा- सुनील केदार

मेट्रो रिजनमधील घरकुल प्रकल्पाचा घेतला आढावा

नागपूर : नागपूर महानगर मेट्रो विकास प्राधिकरणा (एनएमआरडीए) अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या घरकुल योजनेसंदर्भातील संपूर्ण योजनेचा आढावा घेऊन योजनेसंदर्भातील नव्याने यादी बनवून शासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज दिल्यात.

Advertisement

नागपूर महानगर मेट्रो विकास प्राधिकरणच्या घरकुल योजनेसंदर्भातील कामाचा आढावा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, जिल्हा परिषदेचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, एनएमआरडीएच्या आयुक्त शीतल तेली-उगले उपस्थित होत्या.

Advertisement

जिल्हा परिषद अध्यक्षांचे यादीबाबत आक्षेप असल्यामुळे त्यांच्या सूचना लक्षात घेऊन हा प्रस्ताव महानगर आयुक्त श्रीमती तेली यांनी अंतिम मंजुरीच्या दृष्टीने शासनाला सादर करावा. केपीएमजी या नोडल एजन्सीने बनविलेली मेट्रो रिजन घरकुल वाटपाची गरजू आणि लाभार्थ्यांची यादी आयुक्तांनी स्वत: तपासून घ्यावी. आयुक्तांना यादी सदोष आढळल्यास त्यांनी ‘स्यु मोटो’ कारवाई करावी, असेही श्री. केदार म्हणाले.

तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागात जिल्हा परिषदेअंतर्गंत राज्य शासनाच्या विविधि योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे काम करण्यात येत आहे. नागपूर जिल्हा परिषदेने शबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना आणि आदिवासी विकास योजनेतून गरीब गरजू आणि पात्र लाभार्थ्यांसाठी 15 हजार घरकुल बांधणीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. तो मंजूर करण्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

नागपूर मेट्रो रिजनमधील घरकुल वाटपाच्या यादीत गरजू पात्र लाभार्थ्यांचाच समावेश झाला आहे, यादीची खातरजमा करावी. योजनेच्या अटी शर्तीनुसार ही यादी बनविण्यात आली आहे, ती आयुक्तांनी रँडम पद्धतीने तपासावी. ग्रामीण भागातील गरीब, पात्र आणि गरजूंचाच समावेश असावा, याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच घरकुलांचे बांधकाम करताना त्याचे नकाशे नगररचना विभागाकडून मंजूर करुन घेतल्याची तपासणी करणे अनिवार्य आहे. तसेच नागपूर मेट्रो महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत करण्यात येत असलेल्या विकासकामांचा भविष्यात दर आठवड्याला आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सुनील केदार यांनी सांगितले.

तत्पूर्वी नागपूर मेट्रो महानगर विकास प्राधिकरणच्या आयुक्त शितल तेली-उगले यांनी घरकुल वाटप प्रक्रियेबाबत माहिती दिली. या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement