Published On : Mon, Aug 3rd, 2020

डॉ.अनिल पावशेकर लिखित ‘अगं बाई अरेच्चा’चे प्रकाशन उत्साहात

डॉ.पावशेकरांची लेखनशैली नवोदितांचा प्रेरणादायी स्त्रोत- राहुल पाटील

नागपूर: लेखनकलेचा छंद जोपासणे हे सध्यास्थितीत संस्कारक्षम असून ते समाजासाठी बोधामृत असायला हवे. प्रत्येक लेखकाने कुणाच्याही दडपणाखाली व भीती मनात ठेवून लिखाण न करता मुक्तपणे कोणत्याही विषयावर सुचेल तसे लिहत रहावे. सुप्रसिद्ध लेखक व साहित्यसेवारत्न पुरस्कार प्राप्त डॉ. अनिल पावशेकर यांची लेखनशैली ही नवोदित कथालेखकांसाठी प्रेरणादायी स्त्रोत असल्याचे मराठीचे शिलेदार संस्थेचे मुख्य संपादक, संस्थापक, अध्यक्ष राहुल पाटील यांनी गौरवोद्गार काढले. ते अगं बाई अरेच्चा या लेखसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

Advertisement

पुढे ते म्हणाले, की फार्स या प्रकारात लिखाण दुर्मिळ होत चालले असल्याने पावशेकर यांच्या माध्यमाातून मराठी साहित्य क्षेत्राला नवा आयाम त्यांच्या लेखन प्रकारातून प्राप्त होत असून ते भूषणावह आहे. २३ लेखांचा समावेश असलेल्या या लेखसंग्रहात क्रीडा, सामाजिक, राजकारण, प्रासंगिक ललित प्रवास वर्णन अशा विविधांगी प्रकरणाला स्थान देण्यात आले आहे. यातील प्रवासवर्णने ही भावी पिढीला उपयुक्त असे असून त्याचा अभ्यासक्रमात निश्चितीच समावेश व्हावा अशी पाटील यांनी इच्छा व्यक्त केली. समूहाच्या प्रशासक व प्रसिद्ध कवयित्री सौ सविता पाटील ठाकरे सिलवासा यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे पाटील यांनी वाचन करून पावशेकर यांच्या पुढील साहित्य लेखनास शुभेच्छा दिल्यात.

नागपूर नगरीचे भूषण असलेले तसेच मराठीचे शिलेदार समूहात ‘अगं बाई अरेच्चा’ नावाने सदर लिखाण करणा-या डॉ अनिल पावशेकर यांच्या लेखसंग्रह असलेल्या “अगंबाई अरेच्चा ” या पुस्तकाचे प्रकाशन मैत्री दिनाचे औचित्य साधून दि. ०२/०८/२०२० रोजी श्री राहुल पाटील (संस्थापक आणि अध्यक्ष म.शि.ब.संस्था) यांच्या शुभहस्ते, डॉ नानाभाऊ पोजगे (उपाध्यक्ष निमा महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ सुनिल पाटील (ज्येष्ठ चिकित्सक) यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी समर्थ हॉस्पिटल, त्रिमुर्ती नगर येथे एका छोटेखानी कार्यक्रमात पार पडले‌.

कार्यक्रमाचे संचालन मोहिनी पावशेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ प्रदिप पाटील यांनी मानले. याप्रसंगी सोशल डिस्ट्सनिंग पाळत निवडक वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर व वाचक मित्र प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement