नगरपरिषद चा स्तुत्य व अनोखा उपक्रम
रामटेक-आदेशाचे पालन करून मास्क वापरून का सहकाऱ्य करून स्वतःची परिवाराची व जनतेची काळजी घेणाऱ्याचा पुष्प व प्रमाणपत्र देऊन मुख्याधीकारी स्वरूप खारगे यांनी गौरव केला .नगरपरिषद च्या स्तुत्य उपक्रम ने एक चांगला मोलाचा संदेश दिला.नगरपरिषद रामटेक मार्फत अनोखा उपक्रम राबउन मास्क घालून वावरणाऱ्या जबाबदार नागरिकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला शहरातील अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहऱ्यावर मास्क घालतात. पण जे नाही घालत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. दंड भरून घेऊन त्यांना मास्कही दिला जातो.
पण आज नगरपरिषद मार्फत नियमांचे पालन करणाऱ्या सर्व नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून काही नागरिकांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येऊन आभार व्यक्त करण्यात आले. यामध्ये मास्क चा वापर करणारे दुकानदार, वाहनवरून जाणारे नागरिक, वृद्ध महिला, वृद्ध जोडपे, तरुण, तरुणी, छोटी मुले यांना प्रतिनिधी म्हणून गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे इतर नागरिक निश्चितच प्रोत्साहित होतील व नियमांचे पालन करतील अशी आशा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी व्यक्त केली.
कोरोना संक्रमणाच्या काळात स्वतःच्या सुरक्षेला खुप जास्त प्रमाणात महत्व असून प्रशासन सातत्याने जनजागृती करीत आहे. सुरक्षेच्या कोणकोणत्या उपाययोजना करण्यात याव्या याची निरंतर माहिती देत आहेत. पंरतु सार्वजनिक ठिकाणी फिरतांना नागरिक नियमांची अमलबजावणी करताना दिसत नाही. त्यामुळे मुख्याधिकारी स्वरूप खारगे,n पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या संयुक्त पथकाने रामटेक शहरात बस स्टँड व इतर ठिकाणी कारवाइ करत मास्क नसलेल्या नागरिकांवर कारवाईचा बडगा सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताप्रसाद शेंडगे , पोलिस उपनिरीक्षक कोळेकर , हत्तीमारे ,नगरपरिषद चे अधीकारी राजेश सव्वालाखे, रोहित भोईर व कर्मचारी वर्गाने कारवाई केली.जिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे यांचे आदेशानुसार नवीन दंड 500/- वसूल केला गेला . 350 व्यक्तींवर कारवाई झाली आहे.
आतापर्यंत एकूण दंडाची वसुली एकूण एक लाखाच्या वर केली गेली असल्याचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे, यांनी सांगितले
मास्क नसलेल्या नागरिकांवर कारवाईचा बडगा सतत सुरु राहील. परिवाराची व जनतेची काळजी घेणाऱ्या चा पुष्प देऊन त्यांना प्रोत्साहन देणे प्रतिसाद देणे प्रशासन चे प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे मास्क घालून प्रशासन ला सहकार्य करण्याची अपील मुख्याधिकारी स्वरूप खारगे, यांनी जनतेला केली –

