Published On : Thu, Sep 29th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

Advertisement

नागपूर : ॲार्गनाइझेशन फॅार राईट्स ॲाफ ह्युमन ॲाफ (ॲाफ्रोह) महाराष्ट्र, या संघटनेने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विरोधात संविधान चौकात आमरण उपोषण सुरू आहे. याची दखल घेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. शासनानाने तातडीने या कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर बैठक लावावी यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले.

बावनकुळे म्हणाले, २९ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. मुंबईलासुद्धा ६९ दिवस हे आंदोलन चालले. पुन्हा एकदा सर्व कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. शासनानाने तातडीने या कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर बैठक लावली पाहिजे आणि यांचे प्रश्‍न सोडविले पाहिजे. मी आमदार प्रवीण दटके आणि आमदार विकास कुंभारे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्र्याकडे हा विषय मांडला आहे, पत्रव्यवहारही केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जातपडताळणी समितीकडून होणारा अन्याय नेहमीच पाहण्यात येतो. जे कर्मचारी निवृत्त झाले, त्यांच्यासाठी आणि चे निवृत्त होणार आहेत, त्यांच्यासाठी काय मार्ग काढता येईल, यावर आता काम करणे गरजेचे आहे. यासाठी शिंदे-फडणवीस सरकार तत्पर आहे. जनसामान्यांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण आहे. ते लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घेतील, असा विश्‍वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Advertisement
Advertisement