Published On : Mon, Mar 26th, 2018

महानगर क्षेत्रातील तीर्थक्षेत्रे स्वदेश दर्शन योजनेतून जोडणार

Advertisement

• मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महानगर क्षेत्राची बैठक
• 1759.71 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी
• 1123 अनधिकृत बांधकामांना नोटीस
• ताजबागची कामे 2019 पर्यंत पूर्ण करा
• फुटाळा-अंबाझरी 74 कोटींच्या प्रकल्पास मान्यता
• महानिर्मितीच्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजना
• 25000 घरकुले आणखी बांधा
• शांतीवनचे काम लवकर पूर्ण करा
• कोराडी मंदिराचे काम जलदगतीने करा

नागपूर: शहरालगत असलेल्या व नागपूर महानगर क्षेत्रात येणाऱ्या वाकी, आदासा, धापेवाडा, पारडसिंगा, तागबाग, तेलंखेडी व वर्धा जिल्ह्यातील गिरड ही तीर्थक्षेत्र एकमेकांना स्वदेश दर्शन योजनेतून जोडण्यात येणार असून महानगर क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील तीर्थस्थळाच्या विकासासाठी 59.31 कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनकडे पाठवण्यात आला आहे. तसेच शहराजवळील अनधिकृत 1123 बांधकामांना नोटीस देण्यात आल्या असल्याची माहिती एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज मुंबई येथे विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका बैठकीत दिली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एनएमआरडीएच्या झालेल्या बैठकीतील विषयांना मंजुरी देण्यासाठी व आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार, जि.प अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ.अनिल सोले, आ. समीर मेघे आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधीर पारवे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेसी, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महानगर क्षेत्राअंतर्गत खडका, किरमिटी, शिवमडका, सुमठाणा, पांजरी, सुमठाणा कोतेवाडा, सोंडापार जामठा- परसोडी या दो मुख्य जलवाहिकांच्या कामासाठी 22.49 कोठींना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. तसेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 2017-18 चे सुधारित व 2018-19 च्या 1759.71 कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान करण्यात आली.

महानगर क्षेत्राच्या मंजुर विकास योजनेतील विकास प्रस्तावांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 9 शहरी विकास केंद्र तयार करण्यात आली. नासुप्रद्वारे अमरावती रोडवरील रिंगरोड जंक्शनवर लॉगिस्टिक स्कीम तयार करण्यात ये‍तील. नागरिकांसाठी महानगर क्षेत्रात टप्प्या टप्प्याने 3 विभागीय कार्यालये सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. महानगर क्षेत्रात सौर ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर, भूजलातील पाण्याचे पुनर्भरन या बाबींना प्राधान्य देण्यात येईल.

या क्षेत्रातील पात्र लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ग्रामीण विकास केंद्रात कृषी मालासाठी बाजारपेठ व गोदामे नाममात्र शुल्कावर उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहेत.

फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे, लाईट साउंड व मल्टी मीडिया शो तसेच अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित लाईट साउंड व लेझर मल्टीमीडिया शोच्या 74 कोटीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली. महानगर क्षेत्रातील 9 शहरी विकास केंद्र, नगर परिषदा, नगर पंचायत व मनपाच्या डंपिंग यार्डमधील 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन निर्मिती प्रकल्प करण्यात येणार आहे.

महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या जागेचा वणिज्यिक स्तरावर विकास करण्यासाठी महानिर्मिंती व महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यात सामंजस्य कारार करण्याचे ठरले.या 189 हेक्टर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यास नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 10 हजार घरांच्या बांधकाम प्रकल्पाशिवाय आणखी 25 हजार नवीन घरकुले बांधण्याचा प्रस्ताव देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचवले. नागपूर शहरातील वीटभट्टयांचे अतिक्रमण हटवून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिला. मोठा ताजबाग दर्गा विकास प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण करा. शांतीवन चिचोली येथील डॉ. आंबेडकर वैयक्तिक वस्तू जतन व संग्रहालय बांधकाम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथील शॉपिंग कॉमप्लेक्स, बस स्टॉप, स्वागत कक्ष, पुजारी निवास, भक्त निवास व पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement