Published On : Wed, Sep 18th, 2019

दीक्षाभूमीच्या दर्शनाने नवी ऊर्जा मिळाली : जे. पी. नड्डा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे घेतले दर्शन : भाजप अनु. जाती मोर्चातर्फे स्वागत

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथून धम्मक्रांती घडविली, अशा पवित्र दीक्षाभूमीच्या दर्शनाने पुढील कार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली, असे भावुक उदगार भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काढले.

श्री. जे.पी. नड्डा बुधवारी (ता. १८) नागपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. दीक्षाभूमी येथील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भावुक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यानंतर त्यांनी अभिप्राय वहीत अभिप्राय नोंदविला. यावेळी त्यांच्यासोबत शहर भाजपा अध्यक्ष प्रवीण दटके, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, माजी खासदार अजय संचेती, आ. सुधाकरराव देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकरराव कोहळे, अशोक मेंढे, सुभाष पारधी यांची उपस्थिती होती.

भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने शहर अध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी श्री. जे.पी. नड्डा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अशोक मेंढे, सतीश शिरसवान, राहुल झांबरे, मनीष मेश्राम, शंकर मेश्राम, रोहन चांदेकर, विजय फुलसुंगे, विजय गजभिये, प्रभाकर मेश्राम, चंद्रशेखर केळझरे, व शेकडों कार्यकर्ते उपस्थित होते.