Published On : Wed, Jul 3rd, 2019

जुनी कामठी पोलिसांनी दिले 18 गोवंश जनावरांना जीवनदान

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भाजीमंडी येथे अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी सापळा रचून राम मंदिर समोरून भाजीमंडी कडे जात असलेल्या पिकअप गाडी वर धाड मारण्यात यश गाठले वेळीच वाहनचालकाने घटनास्थळाहुन।पळ काढले .

तर या कारवाहितुन जप्त पिकअप वाहन क्र एम एच 20 ई जी 1183 व वाहनातील 18 गोवंश जनावरे ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान देण्यात आले. या कारवाहितुन जप्त पिकअप वाहन किमती 5 लक्ष रुपये व 18 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 81 हजार रुपये असा एकूण 6 लक्ष 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर पसार आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

ही यशस्वी कारवाही डीसीपी हर्ष पोद्दार, एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, दुययम पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, किशोर मालोकर, दिलीप ढगे, अलोक रावत, येशीराम कारेमोरे, विवेक श्रीपाद, अश्विन साखरकर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी