Published On : Wed, Jul 3rd, 2019

चारचाकी वाहन पकडुन ११ जनाव रांना पोलीसांनी दिले जिवनदान

Advertisement

एक आरोपीसह ५ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील बंद टोल नाका वराडा येथे सापळा रचुन पिकअप झेनॉन (टाटा) चारचाकी वाहनात निर्दयपणे कोबुन भरून ११ जनावरांची (गाईची ) अवैध वाहतुक करून कत्तल खाना कामठीकडे नेताना पोलीसांनी डुमरी वरून पाठलाग करित बंद टोल नाका येथे पकडुन ११ गाईना जिवनदान देऊन पिकअप चारचाकी वाहनासह एकुण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक आरोपींला अटक करण्यात आली आहे.

गोपनिय सुत्राच्या माहीती व्दारे पिक अप चारचाकी वाहनात जनावरांना कोबुन कत्तलीकरिता कामठीकडे अवैध वाहतकीची मिळालेल्या गु्प्त माहीती वरून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशा नुसार कन्हान पोलीसांनी मंगळवार (दि. ४) ला रात्री ९ वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील बंद टोल नाका समोर सापळा रचुन झेनॉन (टाटा) पिकअप चारचाकी क्र एम एच ३० ए बी ४२३६ किंमत ५ लाख सह जनावर किंमत ८० हजार असा एकुण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी वाहन चालक बबलु उर्फ लोकनाथ मुन्ना स्वामी पिल्ले (२२) रा. कोळशा टाल कामठी यास अटक केली.

कन्हान पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५ अ, ५ ब, ९, प्राणीछळ प्रतिबंधक कायदा १९६० नुसार ११ (अ) (ब)अन्वये वाहन मालक व चालका विरूध्द गुन्हा दाखल करून रात्रीच ११ जनावरांना गौरक्षण लाखनी ला नेऊन सुपुर्द केले व ११ गाईला जिवनदान दिले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपवि भागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्या आदेशानुसार कन्हान थानेदार चंद्रकांत काळे यांचे मार्गदर्शनात ए पी आय प्रमोद पवार, सिपाही मंगेश सोनटक्के, जितु गावळे, संजय भदोरिया , मुकेश वाघाडे सह पोलीस कर्मचारी हयांनी सक्रिय सहभाग घेत यशस्वी रित्या पार पाडली.

रात्रीच्या वेळी याच मार्गानी नेहमी कामठी कत्तलखान कडे ट्रक व चार चाकी वाहनात मोठय़ा प्रमाणात जनाव रांची अवैध वाहतुक करण्यात येत असल्याने पोलीस अधीक्षक साहेबानी स्वत: लक्ष केंद्रित करून महामार्ग वाहतुक पोलीस, नागपुर ग्रामीण वाहतुक पोलीस व कन्हान पोलीस यांची रात्री गस्त वाढवुन जनावरांच्या व इतर अवैध वाहतुकीवर अंकुश लावण्यात यावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.