Published On : Sat, Jun 22nd, 2019

जुनी कामठी पोलिसांनी राबविले ‘कोंबिंग ऑपरेशन’

Advertisement

कामठी :- नागरिकांच्या सुरक्षात्मक दृष्टिकोन तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या दृष्टीने जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत पोलिस निरीक्षक किशोर नगराळे, पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी पोलीस ताफ्यासह गतरात्री 2 वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविले. यामुळे गुन्हेगारीवृत्तीत चांगलीच खळबळ माजली .

रात्री 2 वाजेपर्यंत 17 पोलीस कर्मचाऱ्यासह राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गोंधळ माजविणाऱ्या दोन इसमाना अटक करून त्याविरुद्ध कलम 110, 112, 117 अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला, भादवी कलम 324 प्रकरणातील पकड वारंट असलेला आरोपी मो शाहिद वल्द एजाज अन्सारी ला अटक करण्यात आले तसेच जामिनपात्र वॉरंट असलेल्या दोन आरोपीना अटक करण्यात आले त्यानंतर नुकताच हद्दपार भोगून आलेला आरोपी हातात लोखंडी चाकू घेऊन परिसरात दहशत माजवीत असता या आरोपी ला भादवी कलम 4/25आर्म कायद्यांनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी चे नाव समीर उर्फ कव्वा रफिक अहमद शेख वय 41 वर्षे रा फुलओली चौक कामठी असे आहे.तसेच सूर्योदय नंतर ही फिरत असलेल्या संशयित इसम नामे पंकज वर्मा रा येरखेडा वर 122 प्रमाणे प्रतिबंधीत कारवाही करण्यात आली.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच शास्त्री मंच चौकातून गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या वाहनावर धाड घालून कत्तलखान्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या 13 गोवंश जनावराणा ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवीत गोवंश जनावरांना जीवनदान देण्यात आले आरोपी वाहनचालक सचिन रंगारी वय 25 वर्षे रा रमानगर कामठी ला अटक करीत या कारवाहितुन 1 लक्ष 74 हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरे तसेच अवैध वाहतूक करीत असलेले बोलेरो पिकअप वाहन क्र एम एच 40 बी जी 5530 किमती 5 लक्ष रुपये असा एकूण 6 लक्ष 74 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे कोंबिंग ऑपरेशन डीसीपी हर्ष पोद्दार व एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, दुययम पोलीस निरीक्षक देविदास कठाळे , पोलीस कर्मचारी किशोर मालोकर, अलोक रावत, मनोहर राऊत, कारेमोरे, विवेक श्रीपाद, अश्विन साखरकर, विजय भलावी, चालक सुनील, विशाल आदींनी यशस्वीरीत्या राबविले.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement