Advertisement
कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील गणेश ले आउट मध्ये अज्ञात चोरट्यानि एका कुलूपबंद घरात कुणी नसल्याचे संधी साधून कुलूप तोडून अवैधरित्या घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मध्ये सुरक्षित रित्या ठेवलेले सोन्याचे दागिने व नगदी 22 हजार रुपये असा एकूण 80 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना 21 जून ला रात्री निदर्शनास आले असून यासंदर्भात फिर्यादी भूषण दुररेवार वय 36 वर्षे रा गणेश ले आउट येरखेडा कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 454, 457, 380 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी