Published On : Wed, Jul 10th, 2019

पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपण करून रोपट्या चे संवर्धन करण्याची गरज

Advertisement

उपसरपंच अतुल बाळबुधे

कामठी : , पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपण करुन त्या झाडाचे संवरंधण करण्याचे आव्हान तालुक्यातील केम ग्रामपंचायतचे उपसरपंच अतुल बाळबुधे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले

वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात उपसरपंच अतुल बाळबुधे यांचे हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी माजी सरपंच सुरेश महल्ले ,दादाराव मागे ,माजी उपसरपंच सुरेश नरड, वामन गणेश ,ग्राम विकास अधिकारी श्रीमती साखरे, तालुका कृषी सहाय्यक बोरसे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राऊत उपस्थित होत्या सर्व मान्यवरांच्या हस्ते गावातील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत परिसर विविध मार्गाने 200 रोपट्याचे रोपण करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राऊत यांनी केले व आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी श्रीमती साखरे यांनी मानले वृक्षारोपण कार्यक्रमाला कृष्णा ठाकरे ,दुर्योधन ब्राह्मणकर, अभिषेक ढवळे अडम चे माजी सरपंच अमोल खोडके, विष्णू मांगे ,नरेश आतकरे, नीलकंठ मेंढे निशिकांत फुललेले सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी