Published On : Thu, Sep 12th, 2019

कामठीत गणरायाला साश्रू नयनाने निरोप

Advertisement

कामठी :-भक्तांच्याया घरी विराजमान झालेल्या विघ्नहर्त्या गंणराजाची 10 दिवस मनोभावे पूजन करून आज 12 सप्टेंबर अनंत चतुर्दशी निमित्ताने आल्या लाडक्या बापाला भाविकांकडून साश्रु नयनाने निरोप देण्यात आला.यावेळी गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या !या निनादात नाचत गाजत ढोल ताश्याच्या आवाजात फटाक्याच्या आतिषबाजीत येथील महादेव घाटावर गणरायाची मूर्ती विसर्जन करून बापाला निरोप देण्यात आला.यावेळी भाविकांचे अंतःकरण भरून आले.

विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना न घडता विसर्जन यशस्वीरीत्या पार पडावे यासाठी तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या सूचनेवरून डीसीपी निलोत्पल , एसीपी राजेश परदेसी, यांच्या नेतृत्वात जुनी कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, नवीन कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल , दुययंम पोलीस निरीक्षक राधेश्याम पाल यांच्या मार्गदर्शनार्थ जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवून नजर कैद करून सीसीटीव्ही सह करडी नजर ठेवन्यात आली होती.

तसेच नगर परिषद विभागाच्या वतीने मुख्याधिकारी रामकांत डाके यांच्या नेतृत्वात नगर परिषद प्रशासन सज्ज राहून निर्माल्य संकलन साठी तसेच विसर्जन साठी सोयीचे व्हावे यासाठी महादेव घाट तसेच नगर परिषद कार्यलय प्रांगणात कृत्रिम तलावाची सुद्धा सोय करण्यात आली होती.तसेच लायन्स क्लब च्या वतीने सुद्धा स्वछता वर लक्ष केंद्रित करून निर्माल्य संकलनासाठी समाजसेवेची भूमिका साकारली.

संदीप कांबळे कामठी